Ex-MLA will contest elections from teachers’ constituency : आकोट येथे साधला संवाद, शिक्षक मतदारसंघातून तयारी
Akola शिक्षक, शेतकरी, दिव्यांग आणि तळागाळातील जनतेच्या प्रश्नांबाबत गेल्या २५ वर्षांपासून संघर्ष करत आहे. शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या चांगल्या-वाईट घडामोडींचीही मला जाणीव आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक मीच लढावी, अशी मागणी अनेक प्राध्यापक व शिक्षकांनी माझ्याकडे केली आहे, असा दावा माजी मंत्री व प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी केला आहे.
अकोट येथील वसुंधरा ज्ञानपीठ येथे आयोजित शिक्षक परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरातील आठ ते दहा ठिकाणी घेण्यात आलेल्या कॉर्नर मीटिंगद्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या समस्या समजून घेतल्या. अकोटमधील शिक्षकांचा या संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला विठ्ठल बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कुलट, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे, मुख्याध्यापक अनंत कुलट, प्राचार्य शिवचरण नारे, शिवा सांगुणवेढे, सुधाकरराव गीते, डॉ. अभिषेक गावंडे, श्रीकांत सरोदे यांच्यासह वसुंधरा ज्ञानपीठमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसु, प्रहार युवक जिल्हा प्रमुख सुशील पुंडकर, तालुका संघटक शुभम नारे, शहर कार्याध्यक्ष अचल बेलसरे, बल्ली राजा, सिमी जमादार यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.
Bacchu Kadu : राज्यात तीन माकडांचे सरकार; आता रस्त्यावर उतरण्याची वेळ
बच्चू कडू पुढे म्हणाले, “शिक्षण हे पवित्र क्षेत्र असून ते वाचवण्यासाठी मी शालेय शिक्षणमंत्री असताना अनेक प्रयत्न केले. सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक समस्यांचा डोंगर आहे. शिक्षकांनी मला स्पष्ट सांगितले की, या मतदारसंघात लढून त्यांना आवाज द्यावा. ही बाब माझ्यासाठी महत्त्वाची असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल.”