Breaking

Fertilizer shortage : पीक विमा योजना पूर्वीप्रमाणे करू !

Minister of State Ashish Jaiswal said that the crop insurance scheme will be implemented as before : शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेणे सुरू

Nagpur : राज्यातील शेतकरी सद्यस्थितीत अनेक अडचणींना तोंड देत आहेत, याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री खरीपाच्या बैठका घेत आहेत. बियाणे आणि खतांचा तुटवडा कृषी साहित्य विक्री दुकानांत कुठे आहे का किंवा शेतकऱ्यांना कोणती अडचण आहे का, याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

अवकाळी पावसाची स्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यासंदर्भात राज्यमंत्री जयस्वाल यांनी आज (१३ मे) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, विकेल ते पिकेल, ही संकल्पना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याद्वारे राज्यातील उत्पादन कसे वाढवता येईल आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण कसे करता येईल, याचेही प्रयत्न सुरू आहेत.

Caste Census : जातीय जनगणनेचा निर्णय बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर !

पिक विमा योजनेसह सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणुकीची योजना सरकारने आणली आहे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना पूर्वीप्रमाणे करून त्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी आढावा घेतला तेव्हा लक्षात आलं की सुमारे दहा हजार पाचशे कोटींचा निधी विमा कंपन्यांकडे गेला आहे.

India – Pakistan War : मोदींचं भाषण अमेरिकेला इशारा देणारं असायला हवं होतं !

पिक विम्याच्या स्वरूपात जाणारे सर्व पैशांतील बहुतांश रकमेतून भांडवली गुंतवणुकीची योजना केली आहे. पहिला अर्ज करेल त्याला पहिली मंजुरी, अशी प्राधान्याची योजना तयार करून शेतीमध्ये क्रांती कशी होईल, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले. परवासुद्धा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. SDRF, NDRF चे जे निकष आहेत, त्यानुसार पंचनामा करून नियमांनुसार जी मदत करता येते, ते सरकार करत असते, असेही ते म्हणाले.