Breaking

Agricultural irrigation : पहिला हायटेक बलून बंधारा आता बाघ नदीवर

First hi-tech balloon dam now on Bagh River : विदर्भातील पहिला प्रयोग; १० हजार एकर शेतीच्या सिंचनाची सोय होणार

Gondia विदर्भातील जलसंपदा क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत, गोंदिया जिल्ह्यातील रजेगाव येथे बाघ नदीवर राज्यातील पहिला बलून बंधारा उभारण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाकडून १०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे सुमारे १० हजार एकर शेती सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली.

हा बलून बंधारा अमेरिका आणि चीनच्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून, तो हवेच्या दाबाने स्वयंचलितपणे कार्य करणार आहे. बलूनमध्ये सेन्सर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, जे पाण्याच्या पातळीनुसार धरणाचे नियंत्रण करेल. या धरणाची रचना बुलेटप्रूफ असून, पाण्याच्या तळाशी सुमारे ३ मीटर पर्यंत साठवणूक होईल. २५ ते ४० फूट वाळू काढून त्याखाली सिमेंट काँक्रीट टाकण्यात येईल, ज्यावर हा बंधारा उभा राहणार आहे.

Mahayuti Government : निपुण कृतीचा फज्जा! विद्यार्थी उपाशी, शिक्षकही थकले!

रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना अनेक वर्षांपासून पाणी साठवणुकीअभावी ठप्प झाली होती. या योजनेला आता बलून बंधाऱ्यामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाकडून यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत.

डांगोर्ली बॅरेजलाही मंजुरी
याचबरोबर वैनगंगा नदीवरील डांगोर्ली बॅरेज प्रकल्पालाही ३९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे गोंदिया शहराच्या पाणीपुरवठ्याची मोठी गरज पूर्ण होणार असून, भविष्यात पाणीटंचाईची झळ बसणार नाही, अशी माहितीही आमदार अग्रवाल यांनी दिली.

India – Pakistan : हल्लेखोर दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण का मागितले नाही ?

शेती आणि पाणीटंचाई समस्येवर प्रभावी उपाय
या प्रकल्पांमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच, शहर व परिसरातील नागरिकांची पाण्याची गरज भागवली जाणार आहे. पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व शेती क्षेत्रात नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.