Public-private partnership to create skilled manpower : प्रशिक्षणार्थींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या रोजगाराच्या जागतिक संधी मिळणार
Mumbai : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या राज्याच्या व्यावसायिक शिक्षण प्रणालीचा अविभाज्य भाग आहेत. या संस्थांना आता जागतिक औद्योगिक प्रशिक्षणाचे केंद्र बनवून महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहतिली राज्याचे रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) धोरणात्मक भागीदार राहणार असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात आयटीआयने कुशल मनुष्यबळ पुरवून आतापर्यंत मोठे योगदान दिले आहे. मात्र आता जागतिक उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधूनिक प्रशिक्षित उमेदवारांची नितांत गरज भासू लागली आहे. अनेक संस्थांच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे. तसेच काही अभ्यासक्रमांत त्रुटी आहेत. याशिवाय आर्थिक मर्यादांच्या आव्हानांचा सामना संस्थाना करावा लागत आहे. या संस्थांना पुनर्जीवीत करून भविष्यातील गरजा ओळखून कुशल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक असल्याचे मंगलप्रभात लोढा म्हणाले.
Buldhana BJP : भाजपचा विश्वास शिंदेंवरच; बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
काय आहे पीपीपी धोरण ?
अग्रगण्य कार्पोरेट्स, ओद्योगिक संघटना, परोपकारी व्यक्तींना अभ्यासक्रम विकसीत करण्यासाठी अत्याधुनिक जागतिक प्रशिक्षण सुविधा प्रदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. तसेच उद्योगांना कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (CSR) द्वारे शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहभाग पीपीपी धोरणामअंतर्गत वाढवला जाणार आहे.
BJP District President : पश्चिम नागपूर मागितले होते, दयाशंकर तिवारींकडे अख्खे शहर दिले!
पीपीपी धोरणामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण, संस्थेतील पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये थेट उमेदवारी प्रक्षिक्षण आणि कंपन्यांच्या भागीदारीमुळे प्रशिक्षणार्थींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सदर धोरणामार्फत काळानुरूप नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचेही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.