Breaking

Vidarbha Farmers : सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक

Farmers aggressive for loan waiver : सरसकट कर्जमाफीसाठी सिंदखेडराजात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

Buldhana सरसकट कर्जमाफी आणि पीक विमा या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने बुधवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या या मोर्चात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

‘सातबारा कोरा करा, सरसकट कर्जमाफी लागू करा, पीक विमा तात्काळ द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात उद्धवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सहभाग घेत सरकारवर जोरदार टीका केली.

MLA Siddarth Kharat : आमदाराने तलवार फिरवली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला!

“निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याची आश्वासने दिली गेली होती. मात्र सत्तेवर आल्यानंतर सरकारने ती पूर्णतः विसरली आहेत,” अशी टीका करत त्यांनी तात्काळ सातबारा कोरा करण्याची व पीक विम्याची भरपाई देण्याची मागणी केली.

MLA Pravin Tayade : आमदारांनी गायले गाणे… ‘आज मौसम बड़ा बेईमान है’!

शेतीमालाला हमीभाव नसणे, पीक विमा भरपाईत दिरंगाई व दुष्काळग्रस्तांसाठी निधीचा अभाव यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक अडचणी सांगत प्रशासनाकडे लेखी अर्जही सादर केले. या मोर्चात नेते छगनराव मेहेत्रे, दिलीप चौधरी, बद्रीनाथ बोडखे, बालाजी सोसे, गजानन जायभाये, संजीवनी वाघ, विवेक तुपकर, ज्ञानेश्वर खरात यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.