Large potholes formed along the highway : महामार्गालगत तयार झाले मोठे खड्डे, माफियांचा कारनामा
Buldhana समृद्धी महामार्ग हा डोणगाव परिसरातून जातो. मात्र, या मार्गावर गौण खनिज माफियांनी अवैध मुरूम पोखरणे सुरू केले असून समृद्धी महामार्गाच्या जवळून मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार झाले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे भरण्याऐवजी रस्त्याला हानी पोहोचवत आहेत. त्यामुळे महामार्ग उखडण्याची व तुटण्याची समस्या निर्माण होत आहे. या गंभीर समस्येकडे सध्या कोणताही संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे माफियांनी समृद्धी महामार्गाजवळील मुरूम चोरी करण्यासाठी सुगीच्या दिवसांची वाट पाहू लागले आहे.
समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. संपूर्ण आशिया खंडात तो एक महत्त्वाचा महामार्ग मानला जातो. या महामार्गाला देशांतर्गतच नाही तर परदेशी लोकांमध्येही कुतूहल आहे. मात्र या महामार्गाला नुकसान पोहोचवणारे माफिया वाढले आहेत. समृद्धी महामार्गाजवळ हजारो ब्रास मुरूम चोरी करून नेण्यात आलेले आहे. यावर अजूनही कोणतेही नियंत्रण नाही.
Chikhali Congress : भाजप मंत्री विजय शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
विशेषतः लोणी-गवळी रस्त्यावरील पुलाजवळ दोन्ही बाजूंनी मुरूम पोखरणे सुरू असूनही कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार झाले आहेत. हे खड्डे पावसाळ्यात भरून महामार्गासाठी मोठा धोका निर्माण करू शकतात.
२७ जानेवारीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मुरूम चोरीची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर डोणगाव पोलिसांनी एक जेसीबी जप्त केला आणि पोलिस ठाण्यात ठेवला, मात्र तरीही अवैध मुरूम पोखरणे थांबलेले नाही. वाढत्या मागणीमुळे दररोज रात्री मुरूम चोरी सुरूच आहे.
समृद्धी महामार्ग हा भराव टाकून तयार करण्यात आलेला आहे. मात्र त्याच्या जवळील मुरूम पोखरण्यामुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे पावसाळ्यात पाण्याने भरतील व त्यामुळे महामार्गाला मोठा धोका निर्माण होणार आहे. तथापि, हजारो ब्रास मुरूम चोरी करून तयार झालेले खड्डे अजूनही तसेच आहेत.
मुरूम चोरीसाठी माफियांनी जाळ्या तयार केल्या असून त्याचं संरक्षण अजूनही सुरु आहे. त्यामुळे चोरी करणाऱ्यांना अटक होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ या विभागाच्या देखरेखीखाली समृद्धी महामार्ग येतो, तर अवैध मुरूम पोखरणे थांबवण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. याशिवाय पोलीस विभागालाही अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. मात्र संबंधित विभागांकडून कार्यवाही न केल्यामुळे या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धोका निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.