Devendra Fadnavis’s attack on Rahul Gandhi : ‘जय हिंद’ यात्रा खुशाल काढा, पण ती राजकीय करू नका
Nagpur : काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली. आमची काही हरकत नाही. फक्त ती राजकीय यात्रा करू नका आणि आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका, येवढीच आमची अपेक्षा आहे. कारण ज्या पद्धतीने राहुल गांधी कालपासून बोलायला लागले आहेत. त्यातून सैन्याबद्दल अविश्वास दिसतो आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज (१८ मे) देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, एकीकडे ते सेनेवर अविश्वास दाखवतात अन् दुसरीकडे जय हिंद यात्रा काढतात. जय हिंद तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा तुम्ही सेनेच्या पाठीशी विश्वास दाखवाल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला.
PM Awas Scheme : पंतप्रधान आवास योजनेतील आठ लाभार्थ्यांनी प्लॉट विकले!
आज जगभरातून आपल्या डिफेन्स सक्षमतेची मागणी होत आहे. स्वतःच्या देशाचं रक्षण करण्यासाठी सर्वाधिक अद्ययावत शस्त्रास्त्र भारताकडे आहेत, हे जगाला कळून चुकलं आहे. तुर्कीसारखा देश दहशतवादाला पाठींबा देतो, हा मानवतेच्या विरोधात मोठा अपराध आहे. आता त्यांच्या विरोधात भारताने त्यांच्यासोबत व्यवहार करण्यास नकार दिला आहे. देशवासीयांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो, असे फडणवीस म्हणाले.
Debt restructuring scam : जिल्हा बँकेच्या चौकटीत अडकले ११ जण
ऑपरेशन सिंदूरचे यश आपण पाहिले. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियामुले आपण हे करू शकलो. जेव्हा पंतप्रधान २०१४ मध्ये मेक इन इंडियाचा नारा द्यायचे, तेव्हा लोक त्याला जुमला म्हणत होते. मात्र आता इतर देश आपल्याकडे शस्त्रास्त्रांची मागणी करत आहे. हा पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. आज भारताची डिफेन्स कॅपॅबिलिटी पाकिस्तानपेक्षा चार – पाच पट जास्त आहे. आपली सैन्य क्षमता पाहता जगातील पहिल्या पाचमध्ये भारताचा नंबर लागतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेवटी पाकिस्तानने गुडघे टेकवल्यावरच भारताने युद्धविराम केल्याचेही ते म्हणाले.