Breaking

Heaven in hell : जेव्हा १०० कोटींचा आकडा १ कोटींवर आला..!

NCP President Sharad Pawar said that when the figure of 100 crores reached 1 crore : आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कधी काळी राज्य सरकारने कारवाई केली होती

Mumbai : सत्ताधाऱ्यांनी ईडीचा वापर करून अनेक नेत्यांना उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांच्यावर केलेल्या आरोपांत तथ्थ्य नव्हतं, याची उदाहरणे येथे देता येतील. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात एका अधिकाऱ्याने १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार केली. शेवटी ती केस कोर्टात केली आणि १०० च्या आकड्यावरील दोन शून्य गेले आणि ‘१ कोटीचा भ्रष्टाचार’ हा आरोप त्यांच्यावर राहिला, याचे मोठे आश्चर्य वाटले, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

काल (१७ मे) खासदास संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये पवार बोलत होते. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आमचे सहकारी आहेत. त्यांचे जावई इंग्लंडमध्ये टाटा कन्सल्टन्सी या संस्थेमध्ये मोठ्या हुद्यावर होते. येथे खडसेंवर काहीतरी तक्रार होणार आहे, असे जावयांना कळले. त्यामुळे ते खडसेंच्या काळजीपोटी भारतात परत आले. तर येथे आल्यावर ईडीने त्यांना अटक केली. त्यांचा कशाशीही काहीही संबंध नव्हता. तरीही त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

Heaven in hell : सत्तेचा गैरवापर कसा होतो, याचे उत्तम लिखाण !

खडसे, देशमुख अशा अनेक नेत्यांची उदाहरण देता येतील. पण एका गोष्टीची गंमत वाटली की, या सगळ्या मंडळीला त्या ठिकाणी त्रास होता. पण ते कधी नमले नाहीत, एकत्र राहिले आणि एकमेकांना धीर देत राहिले. सगळ्या संकटांतून बाहेर कसे निघता येईल, याची सर्वांनी मिळून काळजी घेतली. संजय राऊतांनी पुस्तकामध्ये दोन राजवटींचा उल्लेख केलेला आहे. एक एनडीएच्या काळात आणि नंतर युपीएच्या काळातील. ईडीने कोणत्या पक्षांवर केसेस केल्या, याची माहिती त्यांनी दिलेली आहे.

Heaven in hell : संजय राऊत यांनी पत्रा चाळीतील भ्रष्टाचार बाहेर काढला, अन् त्यांनाच जेलमध्ये टाकलं !

एनडीएच्या काळात १९ जणांवर कारवाई केली होती. युपीएच्या काळात ९ लोकांवर आरोपत्र सादर केले होते. पण कुणालाही अटक केली नाही. एनडीएच्या काळात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, डीएमके, बिजू जनता दल, आरजेडी, बसपा, समाजवादी पार्टी, टीडीपी, आप, मार्क्सवादी कम्यूनीस्ट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, अन्ना द्रमुक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, टीआरएफ इतक्या पक्षांच्या नेत्यांवर चौकशी करून केसेस केल्या गेल्या. याचा अर्थ देशातील अपोझिशन उद्ध्वस्त करायचं, हा निकाल ईडीच्या माध्यमातून घेण्यात आला होता, असेही शरद पवार यांनी नमूद केले.