Breaking

Revenue Department : ‘जिवंत सातबारा’तून पाच लाख नोंदी करण्याचा विक्रम !

Record of making five lakh entries from ‘Jivant Satbara’ : २२ लाख उतारे अद्ययावत करण्याचे महसूल विभागाचे उद्दीष्ट

Mumbai : सातबारांचे उतारे अद्ययावत करण्याच्या अभियानातील दुसऱ्या टप्प्याला महसूल विभागाने १ मेपासून सुरुवात केली आहे. सुमारे २२ लाख उतारे अद्ययावत करण्याचे उद्दीष्ट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निश्चित केले आहे. त्यांपैकी जिवंत सातबारा मोहीमेतून आतापर्यंत पाच लाख उताऱ्यांवर वारसांच्या नोंदी करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.

महसूल विभागाच्या जिवंत सातबारा मोहिमेमुळे शेतकऱ्यांसाठी जमिनीच्या मालकी हक्कांच्या नोंदी सुलभ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ५ लाख उताऱ्यांवर नोंदी करून महसूल विभागाने विक्रम केलेला आहे. उताऱ्यांवरील अनावश्यक आणि कालबाह्य नोंदी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेत मृत खातेदारांची नावे काढून कायदेशीर वारसांची नोंद केली जात आहे. राज्यातील ४५ हजार गावांमध्ये प्रत्येक गावात किमान ५० उताऱ्यांवर नोंदी होणार आहेत.

Gadchiroli Industrial Revolution : गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांतीच्या नावावर लूट !

ई फेरफार प्रणालीद्वारे तलाठी आणि मंडळ अधिकारी हे काम करत आहेत. सोबतच अपाक शेरा, एकुम नोंद, तगाई कर्ज, भूसुधार कर्ज, पोकळीस्त यांसारख्या कालबाह्य नोंदी हटवल्या जात आहेत. भूसंपादन निवाडा, बिनशेती आदेश, पोटखराब क्षेत्राचे रुपांतर, स्मशानभूमी नोंदीही अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

North Maharashtra University : महाराष्ट्रात तयार होणार १० हजार सायबर सुरक्षा तज्ज्ञ !

सुरूवातीला पश्चिम विदर्भातील बुलढाणा आणि अकोला येथे यशस्वी प्रयोग करण्यात आला. त्यानंतर ही मोहिम राज्यभर राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड, वारस प्रमाणपत्र सादर करावे लागतील. अद्ययावत उतारे भूलेख पोर्टलवरून डाऊनलोड करता येतील. डिजिटल तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. ही मोहीम शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.