Claims that India was defeated in the war with Pakistan : पाकसोबतच्या युद्धात भारताचा पराभव झाल्याचा दावा
Nagpur वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ Operation Sindoor वर जोरदार टीका केली आहे. हे ऑपरेशन म्हणजे लुटुपुटूची लढाई होती, अशी टीका त्यांनी केली आहे. त्याचवेळी पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारताचा खरं तर पराभव झाला आहे, असा दावाही त्यांनी केला. त्यांच्या या विधानाने चांगलीच खळबळ उडाली आहे.
पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. इंदिरा गांधी यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी कशाचीही तमा न बाळगता पाकिस्तानचे दाेन तुकडे केले. तशीच संधी पुन्हा चालून आली होती. देशाचे सैन्य लढाई जिंकण्याच्या जवळ आले होते. परंतु आपण जिंकलेली लढाई हरलो. ऑपरेशन सिंदूर ही लुटुपुटुची लढाई आहे. या युद्धात भारत सपशेल हरला आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.
Raj Thackeray: ‘सरकारने ही गोष्ट कायमची मनात कोरून ठेवावी..’- राज ठाकरें
फुले-आंबेडकर इंटेलेक्चुअल फोरमच्यावतीने कस्तुरचंद पार्कजवळील परवाना भवन येथे ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची परिस्थिती या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. भारताची जगात झालेली नाचक्की, पाकिस्तानची कायमची जिरविण्याची संधी आणि विरोधकांची मिळमिळीत भूमिका यावर बोचरी टीका केली. हल्ला दहशतवादी केंद्रातून नव्हे पाकिस्तानातून होत असतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सुरू आहे. पाकिस्तानचे पाच तुकडे वा नेस्तनाबूद करण्याची मोठी संधी देशाने गमावली, असं आंबेडकर म्हणाले.
Cabinet Meeting : आता बोला… हिंदी भाषे बाबतचा सरकारच्या निर्णयाला शिंदे गटाचा विरोध !
विश्वगुरू जग पालथा घालत आहेत. परंतु, एकाही राष्ट्राला आपल्या बाजूने उभे करू शकले नाहीत, असा दावा त्यांनी केला. संघाचे बोधचिन्ह स्वस्तिक आहे. ते हिटलरला मानतात. दुसरीकडे इस्रायलवर अवलंबून आहेत. अर्थात ज्यूंवर अवलंबून आहे. हिटलर व ज्यू यांचा ‘३६’ चा आकडा आहे. संघ याच आकड्याशी खेळत आहे. असे अतात्त्विक राजकारण देशासाठी घातक असल्याचे आंबेडकर म्हणाले.