Breaking

Amravati Divisional Commissioner : महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवे मापदंड!

New standards for revenue department employees : विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांचा प्रस्ताव ठरला सर्वोत्तम

Amravati महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या मूल्यांकनासाठी शासनाने काही मापदंड (Key Performance Indicators – KPI) निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावांसाठी राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सादर केलेला अहवाल अत्युत्कृष्ट ठरला. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हा सत्कार नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत आयोजित ‘महा-स्ट्राईड’ कार्यशाळेत करण्यात आला. या कार्यशाळेत श्वेता सिंघल यांनी “महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाकरिता मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक निश्चित करणे” या विषयावर सादर केलेला अहवाल राज्यभरातून सर्वोत्तम ठरला.

Minister Jaikumar Gore : विकासात समतोल, कुठेही भेदभाव नाही, मंत्र्यांचा दावा

या अहवालाच्या तयारीसाठी अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे सुचवले होते. त्यामुळे समिती सदस्य म्हणून हे सर्व अधिकारी सत्कारप्रसंगी उपस्थित होते.

राज्य शासनाने महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचा व्यापक अभ्यास करण्यासाठी सहाही विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध विषय समित्यांची स्थापना केली होती. अमरावती विभागीय समितीला ‘विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजासाठी KPI निश्चित करणे’ हे अत्यंत महत्त्वाचे दायित्व सोपवण्यात आले होते.

Ex-minister Dr. Sunil Deshmukh : अमरावतीचा रखडलेला उड्डाणपूल पोहोचला उच्च न्यायालयात!

या कामाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सिंघल म्हणाल्या की, “मुख्यमंत्र्यांची प्रेरणा आणि महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांचे मार्गदर्शन, तसेच नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख यांच्याशी झालेल्या सखोल चर्चा यामुळेच हे काम शक्य झाले. उपसमितीतील अध्यक्ष व सदस्यांनी दिलेल्या अथक योगदानामुळेच आम्ही कमी वेळात KPI अहवाल तयार करू शकलो.”