Sanjay Raut said, Fadnavis, Shinde and Rane demanded an apology : संजय राऊत म्हणाले, फडणवीस, राणेंनी माफी मागावी!
Mumbai : बहुचर्चित दिशा सालियन प्रकरणात एसआयटीने आदित्य ठाकरे यांना क्लीन चीट दिली आहे. संजय राऊत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत माफी मागण्याची मागणी केली आहे. राऊत यांनी या प्रकरणात भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरेंना बदनाम केल्याचा आरोप केला, बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचं मृत्यूप्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.
दिशाची हत्या झाल्याचा व तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप झाला होता. मात्र तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाली हे कोणत्याही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झाले नाही. दिशाच्या मृत्यूप्रकरणात घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र एसआयटी ने जारी केलं आहे. याप्रकरणातील आरोप निराधार असल्याचं त्यात नमूद केलं आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चीट मिळाली आहे. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राणे, फडणवीसांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
आता फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. दिशा सालियन प्रकरणात पोलिसांचा जर क्लिनचीटचा रिपोर्ट आला. ही आत्महत्याच आहे. राणेंचा मुलगा आहे ना. त्याला टिल्या म्हणतात. तो मंत्री आहे, तसेच एकनाथ शिंदे आहेत या लोकांनी शिवसेनेची आणि आदित्य ठाकरेंची माफी मागितली पाहिजे. एका तरुण नेत्याला त्यांनी घेरलं तसेच बदनाम केलं. पण आम्ही मागे हटलो नाही. त्यामुळे आता तुमच्याकडे थोडीशी नैतिकता असेल तर आदित्य ठाकरेंची माफी मागा, अशी मागणी राऊत यानी केली.
Harshvardhan Sapkal : पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या!
पोलीस, ही एसआयटी आमची नाही. तुम्हीच स्थापन केलेली आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांनी मंत्री म्हणून चांगलं काम केलं. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्याचं काम यांनी केलं. सत्य समोर आलं आता काय करणार. सर्वात आधी फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे. असं राऊत म्हणाले. नेपाळ्यासारख बडबडणाऱ्या राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागितली पाहिजे. ज्यांनी आऱोप केले आणि बदनामी केली त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागितली पाहिजे. तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता, बदनाम करता यंत्रणेचा आणि सत्तेचा गैरवापर करता. पण लक्षात ठेवा तुमच्यावर एक दिवस डाव उलटला जाईल, तेव्हा आम्ही पाहू असा इशाराही राऊत यांनी दिला.
Devendra Fadnavis : नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची तत्कालीन मॅनेजर दिशा सालियान हिने 8 जून 2020 रोजी मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाला आत्महत्या मानून तपास केला. दिशाच्या वडिलांनी पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले. होते.नंतर मात्र त्यांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. त्यांनी पुन्हा चौकशीची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली.दरम्यान या प्रकरणात झालेले आरोप खोटे आहेत, निराधार आहेत असे सांगत ही याचिका फेटाळून लावावी अशी हस्तक्षेप याचिका शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी केली आहे.
___