Breaking

successful surgery : कर्करोगामुळे ‘प्रायव्हेट पार्ट’ गमावलेल्या तरुणाच्या जीवनात नवी पहाट

Reconstruction through plastic surgery the countrys first successful surgery : प्लास्टिक सर्जरीने पुनर्रचना; 10 तास, 7 सर्जन अन् देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

Nagpur : एका तरुणाचा संपूर्ण ‘प्रायव्हेट पार्ट’ म्हणजे लिंग एकाच टप्प्यात पुन्हा तयार करून एक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात यश मिळाले आहे. संबंधित रुग्णाला 8 वर्षांपूर्वी कर्करोगा मुळे लिंग गमवावे लागले होते. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर तो रुग्ण पूर्ण बरा झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
लिंगाच्या रचनेसाठी, रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट व मूत्रमार्गाची नळीची पुनर्बांधणी करण्यात आली. लिंगाला रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणे आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यास सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे या बाबींचा समावेश या शस्त्रक्रियेमध्ये होता. ही संपूर्ण शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या चमूला पूर्ण करण्यासाठी सुमारे 10 तास लागले. मात्र, अथक प्रयत्नानंतर ‘प्रायव्हेट पार्ट’ प्रत्यारोपणाच सर्जरी यशस्वी झाली आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : मुनगंटीवार म्हणाले, सोलर पंपांची सक्ती अन्यायकारक; शेतकऱ्यांना एजी पंप द्या!

 

विज्ञानाच्या माध्यमातून मानवाने अनेक चमत्कार घडवले आहेत, असे नेहमीच सिद्ध होत आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातून सतत चमत्काराचे दाखलेही दिले जातात. अवघड तसेच जटील शस्त्रक्रिया करुन रुग्णांना जीवनदान मिळाल्याच्या अनेक घटना नोंद झालेल्या आहेत. त्यामुळे ह्रदयरोपण, किडनीरोपण, लिव्हर रोपणाची शस्त्रक्रिया देखील सहज होत आहेत. मात्र, नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात प्लस्टिक सर्जनच्या चमूने मध्य भारतात पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया यशस्वी केल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सुधीर मुनगंटीवार यांची कामगिरी ‘लई पॉवरफुल्ल’

नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांकडून करण्यात आलेली शस्त्रक्रिया “मायक्रोव्हस्क्युलर” शस्त्रक्रिया प्रकारामध्ये मोडते. ही शरीरात ज्या रक्तवाहिन्य अत्यंत लहान आणि सूक्ष्म असतात त्या रक्तवाहिन्यांना विशेष उपकरणांचा मदतीने पुनर्रचनात्मक पद्धतीने जोडल्या जातात, त्याच शस्त्रक्रियेला मायक्रोव्हस्क्युलर असे म्हंटले जाते. डॉ.जितेंद्र मेहता यांच्या नेतृत्वात डॉ.समीर महाकाळकर, डॉ.अश्विनी पंडितराव, डॉ.देव पटेल, डॉ.अभिराम मुंडले, डॉ.कंवरबीर, डॉ.पल्लवी या चमूने ही अवघड कामगिरी यशस्वी केली.

______