Nagpur is becoming the capital of cancer, BJP MLA Praveen Datke told the truth : श्वेता महाले म्हणाल्या, अभ्यास करण्याची गरज नाही, थेट निर्णय दिला पाहिजे
Mumbai : महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी तत्सम पदार्थांचे उत्पादन, विक्री, साठा आणि वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तरीही खुलेआम विक्री केली जाते. यासंदर्भात आज (४ जुलै) सभागृहात लक्षवेधी सुचना मांडण्यात आली. श्वेता महाले, विक्रम पाचपुते, प्रवीण दटके, मनोज घोरपडे, रमेश बोरनारे, मनिषा चौधरी, कृष्णा खोपडे, नारायण कुचे, अनंत नर आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.
प्रवीण दटके म्हणाले, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेशाच्या सीमेवरून गुटखा नागपुरात येतो, अमरावतीतही जातो तेथून सर्वदूर विदर्भात जातो. महाराष्ट्रात सर्वाधिक पानठेले नागपुरात आहेत. नागपूर ही कॅन्सरची राजधानी होत चालली आहे. १२०, १६०, ३६०, बीडीपत्ती ज्या पान ठेल्यावर पकडले जातात. त्यावर कारवाई होते का? शिक्षा काय होते का? पोलिस विभागाची अधिक मदत घेऊन कडक कारवाई करून १०० लोक जेलमध्ये ठेवले तर उर्वरीत १००० लोकांवर वचक ठेवता येईल का?
तपासणीसाठी प्रयोगशाला वाढवू शकतो का? रक्त तपाण्याकरीता प्रयोगशाळाना परवानगी दिली आहे, त्या धर्तीवर खासगी प्रयोगशाळा करता येतील का? एफडीए आणि पोलिसांची संयुक्त कारवाई करता येईल का? स्विगी तत्सम कंपन्यांकडून गुटका आणि दारूसुद्धा पोहोचवली जाते. यांच्यावर कारवाई होऊ शकते का? फुड डिलीव्हरी करणाऱ्यांचे आऊटलेट तपासण्याचा अधिकार एफडीएला आहे का, अशा प्रश्नांचा भडीमार प्रवीण दटके यांनी केला.
Neelam Gorhe : निलम गोऱ्हेंची ठाकरे ब्रँडवर टीका, संदीप देशपांडेंचा फुटकळ असा उल्लेख !
तरुण पिढी गुटखा सुगंधित तंबाखुच्या आहारी केली आहे. कारण शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात खुलेआम गुटख्याची विक्री केली जाते. पोलिसांकडून जी काही कारवाई केलेली आहे. जो जप्त केला, ती एफडीएच्या लॅबमध्ये पाठवायची असते. त्यानंतर चाचणी होऊन कारवाई करायची असते. पण सहआयुक्तांनी आदेश दिले की पोलिसांकडून सॅपलिंग करीता नमुने आले तर टेस्ट करायचे नाही. उलट पोलिसांवरच गुन्हे दाखल करायचे, असे तोंडी आदेश सहसंचालकांनी दिले आहेत. हे गृहस्थ सेवाज्येष्ठता डावलून पदावर बसले आहेत अन् बेकायदेशीरपणे आदेश देत आहेत. मनुष्यबळ कमी असल्याचे सांगितले जाते. पण यांनी १८ डिसेंबरला काढलेले परिपत्रक शासनाच्या विरोधात आहे. ते मंत्र्यांनाही माहिती नाही. अशा अधिकाऱ्याला निलंबित केले पाहिजे, असे श्वेता महाले म्हणाल्या.
एफडीएवरकडे मनुष्यबळ नाही आणि पोलिसांवर विश्वास नाही. सर्व काही आम्हीच करू अशी भूमिका एफडीएची आहे. ‘बोलो जुबा केसरी केसरी..’ अशी जाहिरीत करत मोठमोठे कलावंत केशरी रंगाला बदनाम करत आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तर अधिकाऱ्यांची दालनं फोडली पाहिजे. बंदी आहे तर जाहिराती चालतात कशा? एफडीएकडे केवळ १०० अधिकारी आहे, प्रत्यक्षात ३५० मनुष्यबळ पाहिजे. त्यासाठी परीक्षा झाल्या आहेत. पण हे १०० अधिकारी नवीन भरती होऊ देत नाही. कारण यांचे अधिकार कमी होतील. हे १०० अधिकारी राज्यात हा कारभार चालवत असल्याचा आरोप विक्रम पाचपुते यांनी केला.
Rane vs Thackeray : उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा; हा तर जुहूचा निब्बर!
मनुष्यबळ कमी आहे, हे खरे आहे. राज्यात प्रयोगशाळा तीनच आहेत. त्यामुळे सॅम्पल प्रमाणित करण्यासाठी अडचण होते. पण विभागाने दुर्लक्ष केलं, हे खरं नाही. एप्रिल २४ ते मार्च २५ दरम्यान तपासलेले नमुने ४४९ आहेत. ६३ कोटीचा माल जप्त केला आहे. १२७ वाहने जप्त केली आहेत. २७७ कारवाया पोलिसांना सोबत घेऊन केलेल्या आहेत. पोलिस विभागाने दररोज लहान लहान सॅम्पल आणत गेले, तर पेंडीग राहतील. पोलिसांची माहिती मान्य केली जात नाही, हे खरे नाही. एकट्या संभाजी नगरमध्ये ९४ टक्के कारवाया संभाजी नगरमध्येक केलेल्या आहेत, असे उत्तर या लक्षवेधीवर मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले.
Farmer suicide : शेतकरी आत्महत्येचे थैमान, 3 महिन्यात 767 बळीराजांने मरणाला कवटाळले
अधिकारी कमी असल्यामुळे काहींना कार्यभार दिला गेला आहे. श्वेता महाले यांनी मागणी केल्याप्रमाणे अधिकाऱ्याचे निलंबन नाही, पण अभ्यास करून पण त्या अधिकाऱ्याला दिलेला अतिरिक्त कार्यभार काढला जाईल. झेप्टो, स्विगी, झोमॅटोला परवानगी केंद्र सरकार देते. गोडाऊनसाठी परवानगी राज्य सरकार देते. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे. भारतीय न्याय संहितेचे कलम १२३ अन्वये गुन्हे दाखल केले जातात. खासगी प्रयोगशाळा करण्यासाठी केंद्र सरकारला परवानगी मागितली आहे, असेही नरहरी झिरवळ म्हणाले.