Breaking

Nagpur Municipal Corporation : व्वाह रे सरकार! भर पावसाळ्यात पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’!

Town planning department to cunduct structural audit of bridges : महापालिकेच्या नगरविकास विभागाला अचानक झाली आठवण

Nagpur पाऊस चांगला सक्रीय झाला आहे. कमी-जास्त प्रमाणात का होईना, पण रोज पाऊस पडतोय. अशात भर पावसात राज्याचा नगर विकास विभाग अचानक जागा झाला आहे. नागपुरातील इमारती, शाळा, पुलांचे आता स्ट्रक्चरल ऑडिट structural audit करायला हवे, असे या विभागाला वाटले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जे काम व्हायला हवे ते आता पावसाळ्यात करण्याचे निर्देश नागपूर महानगरपालिकेला देण्यात आले आहे.

महापालिका शहरातील पुल व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करणार आहे. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेला निर्देश दिले आहे. मनपाच्या नगररचना विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विभागाचे अधिकारी झोननिहाय आराखडा तयार करून लवकरच इमारती व पुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करणार आहे.

Jai Gujarat controversy : चूक नाही – मुख्यमंत्री, केम छो साहेब- आव्हाड, हा मंत्रिमंडळात कसा? – राऊत

शहरातील सरकारी कार्यालये, निवासी इमारती, व्यापारी संकुल, शाळा, रुग्णालये यांचेही स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. तर शहरातील धार्मिक व पर्यटन स्थळांच्या वास्तू व गर्दीच्या स्थळांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

जुन्या व देखभाल दुरूस्ती होत नसलेल्या इमारती पावसाळ्यात गळतात, गंजतात. त्यांचा पाया कमजोर होऊन कोसळण्याची भिती असते. पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य सरकारने हे निर्देश दिले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये स्थापत्य अभियंत्यांकडून इमारतींची किंवा पुलांची अवस्था तपासून घेतली जाईल. यामध्ये एखादी इमारत किंवा पूल धोकादायक स्थितीत आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येईल.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : संत्र्याची झाडे लागलेली आहेत, तर मग अंशतः कसे ?

एखादी खाजगी इमारत धोकादायक आढळली, तर तिच्या दुरुस्तीसाठी जबाबदारी संबंधित मालकावर असेल. दुरुस्ती करण्यात अपयश आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मनपाने आता झोननिहाय आराखडा तयार करायला सुरुवात केली आहे. महाल, सीताबर्डी, गांधीबाग आणि फुटाळा तलाव तसेच दीक्षाभूमी परिसरातील इमारतींची लवकर तपासणी होणार आहे.