Breaking

Chandrashekhar Bawankule : सहा मंत्र्यांच्या बैठकीत बच्चू कडूंना आश्वासन दिले होते, तरीही…

The Guardian Minister of Amravati had assured Bachchu Kadu : एक-दोन नव्हे तर तब्बल साडेचार तास त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढला

Nagpur : प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आजपासून (७ जुलै) सातबारा कोरा पदयात्रा डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळ या गावातून सुरू केली. यापूर्वी बच्चू कडू यांनी गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने त्यांना आश्वासन देऊन उपोषणाची सांगता केली होती. त्याउपरही त्यांनी ही पदयात्रा सुरू केली आहे. यावर बच्चू कडू यांचे आंदोलन दुटप्पी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज आजपासून (७ जुलै) सुरू झाले. त्यात सहभागी होण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे मुंबईला रवाना झाले. दरम्यान नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बच्चू कडू यांच्या संदर्भात विचारले असता, ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही स्वतः बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत विधिमंडळाच्या दालनात बैठक घेतली आणि एक-एका मुद्यावर तब्बल साडेचार तास चर्चा केली, मार्गही काढला. त्यांच्या विषयाशी संबंधित सहा मंत्री या बैठकीला उपस्थित होते. त्यांना आम्ही लेखी आश्वासनही दिले. तरीही ते असं करतात, याचे आश्चर्य वाटते.

CISF Soldier : गावकऱ्यांचा साश्रुनयनांनी शहीद जवानाला निरोप!

गरीबांची संख्या वाढत आहे आणि संपत्ती काही श्रीमंत लोकांच्या हातात केंद्रीत होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात विचारले असता, आर्थिक दुर्बल व्यक्तींपर्यंत सरकारच्या योजना आणि त्यांचा लाभ पोहोचला पाहिजे. तो लाभ पोहोचवण्यासाठी काही गोष्टी कमी पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. ती योजना सर्व घराघरांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी आम्हाला काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तरच लोक त्या परिस्थितीतून बाहेर पडतील. त्यामुळे सरकार आणि पक्ष म्हणूनही आम्ही त्यावर काम करतोय, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.