Breaking

Raj – Uddhav Thackeray : हे पुढे एकत्र राहतील, याची शंकाच वाटते !

Eknath Shinde Shiv Sena Minister Ashish Jaiswal doubts that Thackeray brothers will stay together : मन दुखावल्यामुळेच लोक त्यांना सोडून गेले

Nagpur : हिंदी सक्तीच्या मुद्यावर पहिले यश मिळाले म्हणून राज आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त विजय मेळावा नुकताच पार पडला. पण त्याचे कवित्व अद्यापही संपलेले नाही. क्रिया – प्रतिक्रियांचा ओघ सुरूच आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावर प्रतिक्रियी देत दोन्ही ठाकरे बंधू पुढे एकत्र राहतील की नाही, यावर शंका व्यक्त केली आहे.

मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज आजपासून (७ जुलै) सुरू झाले. त्यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल सकाळी मुंबईला रवाना झाले. दरम्यान नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दोन्ही ठाकरेंना एकत्र येण्याची गरज का पडली? जी परिस्थिती आहे, ती एकदम बोलकी आहे. आपल्या स्वकीयांना त्यांनी दूर केल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे.

Chandrashekhar Bawankule : सहा मंत्र्यांच्या बैठकीत बच्चू कडूंना आश्वासन दिले होते, तरीही…

गेल्या २५ – ३० वर्षांचा इतिहास तपासला तर आजपर्यंत शिवसेनेतून जेवढे लोक बाहेर पडले ते अपमानजनक वागणुकीमुळेच. एकनाथ शिंदे वेगळे झाले, तेव्हाच त्यांना परत आणण्याचे प्रयत्न झाले असते तर आज दुसरा राजकीय पक्ष तयार झाला नसता. लोकांची मने दुखवत गेले. त्यामुळेच राज ठाकरेही गेले. ते राज ठाकरेंना एकही जागा द्यायला तयार नव्हते. नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे यांना थांबवण्यात का आले नाही? लोकांची मने दुखवत गेल्यामुळे ही परिस्थिती आली असल्याचे राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले.

CISF Soldier : गावकऱ्यांचा साश्रुनयनांनी शहीद जवानाला निरोप!

गरीबांची संख्या वाढत आहे आणि संपत्ती काही श्रीमंत लोकांच्या हातात केंद्रीत होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात विचारले असता, ही वस्तुस्थिती नाहीये. लोकांचा फायनान्शीअल फोर्स वाढत आहे. लोक श्रीमंत होत आहेत. कदाचित गरीब लोक हे श्रीमंत होतील आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होतील. भविष्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे गरीबांचाही स्तर वाढत आहे. भविष्यात विषमता दूर होईल, असा विश्वास आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.