Breaking

Amol Mitkari : ‘‘मलाच नाही मिळालं, मग शेतकऱ्यांचे काय होणार?’’

MLA angry over farm pond subsidy : शेततळ्याच्या अनुदानावरून आमदार मिटकरी संतप्त;

Akola खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत आमदार अमोल मिटकरी यांनी थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून खळबळ उडवली. ‘‘मलाच शेततळ्याचे अनुदान मिळालेले नाही, मग सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्थिती काय असणार?’’ असा सवाल त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला.

बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी भूषवले. यावेळी आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बद्रु जमा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, तहसीलदार समाधान सोनवणे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे आदी उपस्थित होते.

Tapi Mega Recharge Project : हा प्रकल्प ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान!

शेततळ्यांच्या अनुदानाबाबत चर्चा सुरू असताना कृषी अधिकाऱ्यांनी “एकाही शेतकऱ्याचे अनुदान बाकी नाही” असे सांगितले. मात्र, आमदार मिटकरी यांनी त्याला विरोध करत “मी स्वतः शेतकरी असून माझेच अनुदान मिळालेले नाही” असे सांगून, आपली तक्रार अधिकाऱ्यांकडे नोंदवली.

तीन महिन्यांपूर्वी ई-क्लास जागेवर शेततळे तयार करण्याचे निर्देश आमदार भारसाकळे यांनी दिले होते. मात्र अद्याप प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तीव्र शब्दांत खडसावले. यावर अधीक्षक कृषी अधिकारी किरवे यांनी लवकरात लवकर गावतलाव तयार करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीदरम्यान बियाण्यांच्या नियोजनावर सादरीकरण करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारी केल्या. दानापूर व अडगाव येथील शेतकऱ्यांनी वाढीव अनुदानाची मागणी मांडली. शेतकरी अभ्यास दौऱ्यांसाठी निधी उपलब्ध नसल्याचाही मुद्दा समोर आला.

Whatsapp Call from Pakistan : पाकिस्तानातून आला धमकीचा कॉल; सुरक्षा यंत्रणा सतर्क

या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार मिटकरी व भारसाकळे यांनी कृषी विभागाला तातडीने उपाययोजना करून खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचण होऊ न देण्याचे निर्देश दिले.