Breaking

Amravati airport : अमरावती-मुंबई विमानसेवा अडकली तांत्रिक कचाट्यात!

Amravati-Mumbai flight stuck in technical problems : विमानफेऱ्या वारंवार होतात रद्द; सीट चार्जमुळे प्रवाशांचा संताप

Amravati अमरावती-मुंबई विमानसेवा सध्या वारंवार तांत्रिक कारणांमुळे अडथळ्यांना सामोरी जात आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. अनेक वेळा अचानक विमानफेऱ्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांचे आर्थिक आणि वेळेचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे तिकीट रद्द केल्यानंतरही ‘सीट चार्ज’च्या नावाखाली हजारो रुपये कपात केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी सेवा बंद करण्याची मागणी केली आहे.

बेलोरा विमानतळावर नियमितपणे माहिती देणारा अधिकृत कर्मचारी नेमण्यात एमएडीसी किंवा अलायन्स एअर अपयशी ठरले आहे. प्रवाशांना कुणीही ठोस माहिती देत नाही. त्यामुळे उडवाउडवीची उत्तरे आणि अचानक रद्द होणाऱ्या विमानफेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

District Bank controversy : जिल्हा बँक संचालक पदाचा वाद, बच्चू कडूंपाठोपाठ त्यांचे सहकारीही अडचणीत

मनमानी आणि तांत्रिक कारणांची ढाल
सुरुवातीला काही प्रमाणात नियमित सेवा होती. मात्र, नंतर अलायन्स एअरने तांत्रिक कारणांची ढाल पुढे करत मनमानी सुरू केली. अचानक फेऱ्या रद्द होणे, प्रवाशांना पर्याय न देणे यामुळे सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांनी अलायन्स एअरची सेवा थांबवून दुसऱ्या विमान कंपनीला संधी देण्याची किंवा सेवा बंद करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीचे स्वर…
१६ जून रोजी काही प्रवाशांनी अमरावती-मुंबई विमानसेवेचे तिकीट १२,८५३ रुपयांना खरेदी केले. मात्र, शेवटच्या क्षणी सेवा रद्द झाली आणि केवळ ११,९७२.९९ रुपये परत करण्यात आले. म्हणजेच ‘सीट चार्ज’ म्हणून १,००० रुपयांची कपात करण्यात आली. याबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला — “जेव्हा प्रवासी विमानात चढलेच नाही, तर सीट चार्ज कशाचा?”

Sudhir Mungantiwar : कृषी न्यायालय आणि एग्रीकल्चर ऑफेन्स विंग स्थापन करा!

“अमरावती-मुंबई विमानफेऱ्या रद्द झाल्याची अफवा आहे. केवळ दोन फेऱ्या तांत्रिक कारणांमुळे रद्द झाल्या. येत्या काळात सेवा वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत,असे बेलोरा विमानतळाचे व्यवस्थापक अमरदीप सेहरा यांनी सांगितले.