Dayashankar Tiwari appointed as BJP’s Nagpur city president : भाजपच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती; जिल्हाध्यक्षपद दोघांत विभागले
Nagpur : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची यादी पक्षाने आज जाहिर केली. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर आहे. त्यामुळे नागपूरचे शहराध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. आज भाजपने जाहिर केलेल्या यादीनंतर ही उत्सुकता संपली आहे. विशेष म्हणजे दयाशंकर तिवारींनी विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूर मतदारसंघ मागितला होता. पण त्यांना अख्ख्या शहराची जबाबदारी देऊन ‘रिटर्न गिफ्ट’ देण्यात आले आहे.
नागपूर शहराचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांची भाजपचे नागपूर महानगर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तिवारी उच्च विद्याविभूषीत आहेत. १९८० च्या दशकापासून ते भाजपशी जुळलेले आहेत. या कालावधीत त्यांनी पक्षासाठी मोठे काम उभे केले आणि विविध पदे भुषवली आहेत. तिवारी उत्तम वक्ते आहेत आणि हिंदी साहित्य रत्न पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे.
Buldhana BJP : भाजपचा विश्वास शिंदेंवरच; बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
१९८८ ते १९९१ या कालावधीत दयाशंकर तिवारी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष होते. १९९२ ते ९४ भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक, १९९५ ते ९७ शहर मंत्री, २००७ ते २०१० विदर्भ प्रदेश प्रवक्ता, १९९७ ते २००२ या काळात ते गांधीबाग वार्डाचे नगरसेवक होते. त्यानंतर २००२ ते २००७ या काळात बजेरीया प्रभागातून नगरसेवक झाले. २०१२ ते २०१७ या कालावधीत पुन्हा गांधीबागमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले.
India – Pakistan War : औरंगजेबाची अक्कल आत्ता आली ठिकाणावर !
नागपूर महानगरपालिकेत कामाचा त्यांचा मोठा अनुभव आहे. सत्तापक्ष नेता, स्थायी समिती अध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त, पुन्हा एकदा सत्तापक्ष नेता, त्यानंतर २०२१ ते २०२२ या कालावधीत त्यांनी नागपूरचे महापौरपद भूषवले आहे. २००४ मध्ये त्यांनी मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते अनिस अहमद यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते इच्छुक होते. पण त्यांना संधी मिळाली नाही. तिवारी यांनी वेळोवेळी पक्षनिष्ठा राखली, शिस्त पाळली आणि संघटनात्मक कामांत स्वतःला वाहून घेतले. याचे फळ त्यांना आता मिळाले आहे.