Breaking

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेत अमरावती जिल्हा नापास

Amravati district fails in Chief Minister’s exam : अमरावती एसडीओ ठरले अपवाद; सर्व तालुक्यांची कामगिरी निराशजनक

Amravati राज्य शासनाने १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात जिल्ह्यातील २८ शासकीय विभागांनी १० मुद्द्यांच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविले. यामध्ये अमरावती विभागात अमरावती उपविभाग अव्वल राहिला, पण चौदाही तहसील कार्यालयांचा यामध्ये टिकाव लागू शकलेला नाही. जनकल्याणाची व सेवेची कामे करणाऱ्या कार्यलयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे परीक्षाच या निमित्ताने घेतली होती. त्यात अमरावती जिल्हा नापास झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर केला. शासनाने दिलेल्या वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर आदी १० मुद्यांवर सर्व शासकीय विभागांना कार्यक्रम राबवायचे होते. यानंतर केलेल्या कामकाजाचे प्रेझेंटेशन विभागीय आयुक्तांकडे करण्यात आले व त्यांच्याद्वारा हा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला होता.

CM Devendra Fadnavis : पंतप्रधानांचे भाषण पाकिस्तानसाठी स्पष्ट इशारा

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रशासन अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि तंत्रज्ञान-आधारित बनवणे हा होता. विविध क्षेत्रांतील सुधारणा, नागरिकांसाठी सेवा सुलभ करणे आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील विकासाला गती देणे यांचा कार्यक्रमामध्ये समावेश होता. १३ जानेवारी ते १५ एप्रिल या दरम्यान हा कार्यक्रम राबविण्यात आला.

शासनाने जाहीर केल्यानुसार उपविभागीय कार्यालयांमध्ये अमरावती उपविभाग प्रथम, उपअधीक्षक भूमिअभिलेखमध्ये अचलपूर प्रथम क्रमांक, दुय्यम निबंधकमध्ये नांदगाव खंडेश्वर द्वितीय स्थानी, गटविकास अधिकारी चांदूर रेल्वे द्वितीय, तालुका वैद्यकीय अधिकारी वरूड द्वितीय, एसडीओ कृषी अमरावती द्वितीय, सहायक वनसंरक्षकमध्ये घटांग प्रथम, मोर्शी द्वितीय, अमरावती तृतीय, वन परिक्षेत्र अधिकारीमध्ये धारणी तृतीय ठरले आहेत.

CM Devendra Fadnavis: अत्याधुनिक साधनांनी पोलिस दल सक्षम होणार

प्रकल्प अधिकारीमध्ये भातकुली द्वितीय, सीडीपीओमध्ये नागरी प्रकल्प पश्चिम प्रथम, तर पूर्व अमरावती तृतीय, उपअभियंता मजीप्रा उपविभाग क्र. २ अमरावती प्रथम, तालुका पशुचिकित्सालय दर्यापूर प्रथम, पशुधन विकास अधिकारी तिवसा प्रथम, उपअभियंता बी अँड सी मध्ये उपविभाग क्र. २ अमरावती तृतीय, उपअभियंता महावितरणमध्ये चांदूरबाजार प्रथम, उपविभागीय जलसंधारण अधिकारीमध्ये नांदगाव खंडेश्वर द्वितीय, सहायक निबंधकमध्ये तिवसा तृतीय, वैद्यकीय अधीक्षक वरुड तृतीय, तर गटशिक्षणाधिकारीमध्ये तिवसा तिसऱ्या स्थानी राहिले आहे.