Breaking

Food boycott agitation : वाढदिवशी रविकांत तुपकर करणार अन्नत्याग, काय आहे कारण ?

Farmer leader Ravikant Tupkar will fast on his birthday : कार्यकर्त्यांचे आंदोलनाला बळ, हीच भेट

Buldhana : शेतकरी नेते रविकांत तुपकर दरवर्षी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करतात. क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरच्या कार्यलायातून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांना भेटतात. यावेळी मात्र ते वाढदिवशी म्हणजे १३ मे रोजी आंदोलन करणार आहेत. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात कुटुंबासह ते घराच्या अंगणात अन्नत्याग करतील.

तुपकर यांचे प्रत्येक आंदोलन शेतकऱ्यांसाठी असते. अन्नत्याग आंदोलनसुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह अन्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केले जाणार आहे. शहीद झालेले भारतीय जवान आणि पाकिस्तानच्या हल्ल्यात सीमेवरील गावांमध्ये जे लोक मृत्युमुखी पडले, त्यांना या आंदोलनातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. पहलगाम येथील हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. पण आपल्यालाही काही जवान गमवावे लागले आहेत, असे म्हणत तुपकर हे आंदोनल करणार आहेत.

Ravikant Tupkar : सेवा केंद्रांच्या शासकीय शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्या!

घराच्या अंगणात कुटुंबासह बसून दिवसभर उपवास केला जाणार आहे. आंदोलनाला कार्यकर्त्यांचे बळ हीच आपल्यासाठी भेट असल्याचे तुपकर यांचे म्हणणे आहे. शेतकरी आज संकटात आहेत. दररोज सरासरी १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या परिस्थितीत तरी सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासन पाळावे, ही मुख्य मागणी करण्यात आली आहे.

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांना मिळालेला निधी कर्ज खात्यात वळवू नका !

शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित पिक विम्याची रक्कम जमा करावी. सोयाबीन कापसाला भावातल्या फरकाची रक्कम द्यावी. बॅंकांनी शेतकऱ्यांच्या रकमेला होल्ड लावले आहेत, ते काढावे. बॅंकांकडून जबरदस्ती सुरू असलेली वसुली थांबवावी. याशिवाय शेतींना मजबूत कम्पाऊंड उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी हे आंदोलन करण्याचे ठरवले आहे.