Chandrashekhar Bawankule said that if there is a flood not because of heavy rain, the authorities will be responsible : नाल्यांवरील अतिक्रमणे काढून तात्काळ स्वच्छ करा
Nagpur : महसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या नाल्यांवर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी न होताही पूर सदृष्य परिस्थिती उद्भवते. परिणामी शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. लोकांचा रोष शासनावर होतो. त्यामुळे महसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत महसूल मंत्र्यांनी उपरोक्त निर्देश दिले. यावेळी ते म्हणाले, महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या नाल्यांवर ज्यांनी कुणी अतिक्रमण केलेले असेल, त्यांच्याविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करा. कारण अशा अतिक्रमणाला शासकीय यंत्रणेच्या अंतर्गत असलेले नगर परिषदा, नगरपंचायतींमधील अधिकाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत ठरते. याबाबत शासनाने गांभीर्याने विचार केला आहे. यापुढे पावसाळ्यात अतिक्रमणामुले पूर परिस्थिती उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल.
नागपुरातील बहादुरा ते नरसाळा या भागात टेक ऑफ सिटी व टेक ऑफ गार्डनच्या मालकाने नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून नरसाळा गारगोटी महानगरपालिकेच्या हद्दीत अनैसर्गिकरित्या लहान पाईपलाईनमधून पाणी वळवले. त्यामुळे त्या भागात सतत पुराला तोंड द्यावे लागते, अशी तक्रार तेथील नागरिकांनी केली होती. त्याची तात्काळ दखल महसूल मंत्र्यांनी घेतली आणि अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याचे निर्देश दिले.
Tiranga Yatra : ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या शौर्यासाठी बल्लारपूरात तिरंगा यात्रा !
आढावा घेताना नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, स्थानिक महसूल अधिकारी, विकास प्राधिकरण, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आपापल्या भागांतील नाल्यांची तपासणी केली पाहिजे. अतिक्रमणे काढून सर्व नाले पोकलेनसारखी यंत्रणा वापरून स्वच्छ केले पाहिजे. यामध्ये महसुली नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अतिक्रमण करून बदलला असेल तर दोषींविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.