India defeated Pakistan and showed its strength to the world : पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्प्रभ करण्यात एस-४०० यंत्रणा ठरली महत्वाची
पाकिस्तान समर्थीत दहशतवाद्यांनी जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशन अंतर्गत भारताने केलेल्या हल्ल्यांनी पाकिस्तानातील दहशतवादी आणि त्यांच्या सैनिकांना सळो की पळो करून सोडले आणि पाकिस्तानला गुडघे टेकवण्यास भाग पाडले. या युद्धातून भारताने पाकिस्तानला तर नमवलेच पण जगालाही आपली ताकद दाखवून दिली.
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला. तीन दिवस हा संघर्ष चालला. दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताने अनेकदा हल्ले करण्याचे प्रयत्न केले. अक्षरशः ड्रोनच्या झुंडीच्या झुंडी भारताच्या दिशेने पाठवल्या. पण भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने त्यांच्या एकही हवाई हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. भारतीय बनावटीचे आकाश क्षेपणास्त्रे, बराक – ८ एमआरएसएएम, ड्रोनविरोधी तंत्रज्ञान आणि हारोप ड्रोन यांनी पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरवले. भारताने जेवढ्या ताकदीने हल्ले केले, तेवढ्याच ताकदीने शत्रुंचे हल्ले परतवून लावले आणि जगाला आपली ताकद दाखवून दिली.
NCP Nagpur : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘एकला चलो रे..’चा इशारा !
पाकिस्तानच्या लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांनी भारताच्या हद्दीत घुसण्याचा अनेकदा प्रयत्न केला. याशिवाय शेकडो ड्रोन वापरले आणि आपल्या संरक्षण यंत्रणेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरवले. यामध्ये एस – ४०० ही हवाई संरक्षण प्रणाली सर्वात महत्वाची ठरली. तीन दिवस सुरू असलेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानला एकदाही यश मिळू दिले नाही, हे उल्लेखनीय.
Amol Mitkari : ‘‘मलाच नाही मिळालं, मग शेतकऱ्यांचे काय होणार?’’
उपकरणांची चाचणी..
पाकिस्तानसोबत तीन दिवस चाललेला संघर्ष पाकिस्तानसाठी युद्ध होते. पण भारतासाठी ही सर्व भारतीय बनावटीच्या उपकरणांची चाचणी होती, असे म्हणणे योग्य ठरेल. भारताकडे सर्वाधिक उत्तम क्षमतेची लढाऊ विमाने आहेत, हे या संघर्षात सिद्ध झाले. आकाश, राफेलआणि तेजस यांचा भारताने पुरेपूर वापर केला आणि पाकिस्तानवर कहर बनून तुटून पडला. या युद्धात आपल्या शस्त्रात्रांची चाचणी झाली, हे महत्वाचे.