Breaking

Kerala Lottery : गोव्याच्या सुपुत्राचे महाराष्ट्राशी असलेले भावनिक नाते उल्लेखनीय !

Sudhir Mungantiwar said the emotional connection of a Goan son with Maharashtra is remarkable : सौहार्द, परस्पर सन्मान आणि राष्ट्रहीताच्या दृष्टीने प्रेरणादायी भेट

Thiruvananthapuram : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार कालपासून (१९ मे) केरळ राज्याच्या दोऱ्यावर आहेत. तेथे केरळ लॉटरी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी ते गेलेले आहेत. दरम्यान त्यांनी तिरुअनंतपुरम येथे राजभवनात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची सदिच्छा भेट गेतली.

राज्यपालांसोबतच्या भेटीत शासन व्यवस्थेतील नवोन्मेषी प्रयोग, राज्य सेवेतील मूल्याधिष्ठित अनुभव तसेच महाराष्ट्र – गोवा – केरळ यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांवर सविस्तर चर्चा झाली. राज्यपालांनी केलेल्या आत्मिय स्वागताबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, बिहार, हिमाचल प्रदेश आणि आता केरळ या तिन्ही राज्यांत राज्यपाल म्हणून राजेंद्र आर्लेकर यांनी दिलेली सेवा म्हणजे ‘राष्ट्र प्रथम’ या तत्वाची जिवंत साक्ष आहे.

Job creation : केरळ लॉटरी बदलवेल महाराष्ट्राचे अर्थकारण; मुनगंटीवारांनीच सुचवला होता उपाय !

गोव्याचे सुपूत्र असलेले आर्लेकर यांचे महाराष्ट्राशी असलेले भावनिक व सांस्कृतिक नाते उल्लेखनीय आहे. ही सदिच्छा भेट सोहार्द, परस्पर सन्मान आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी ठरली. महाराष्ट्र व केरळ यांच्यातील सहकार्याच्या नव्या शक्यता या संवादातून निश्चितच आकार घेतील, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Ravi Rava Navneet Rana : स्वबळाच्या मुद्यावरून राणा दाम्पत्य आमने-सामने!

लॉटरीच्या संदर्भात आमदार मुनगंटीवार म्हणाले, केरळ मॉेडेलमध्ये राज्यातील जनतेचा लॉटरी व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे आणि हीच गोष्ट त्यांच्या सातत्यापूर्ण यशामागची खरी ताकद आहे. ही योजना केवळ महसूल वाढीपुरतीच मर्यादित नाही, तर रोजगार निर्मिती आणि सामाजिक कल्याणाचाही प्रभावी स्त्रोत ठरेल, असेही ते म्हणाले.