Balanced development of the state without any discrimination by Mahayuti : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा भाजप कार्यकर्त्यांशी संवाद
Akola “महायुतीच्या शासनकाळात समतोल विकासाला गती मिळाली असून, शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांनुसार कार्यरत आहेत,” असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भाजपाच्या तालुका अध्यक्ष व संचलन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. या कार्यक्रमात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी अभ्यासू मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्कम वाटचाल सुरू आहे.”
Ex-minister Dr. Sunil Deshmukh : अमरावतीचा रखडलेला उड्डाणपूल पोहोचला उच्च न्यायालयात!
या वेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगराध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, किशोर पाटील, माधव मानकर, आम्रपाली उपरवट, वैशाली निकम, कुसुम भगत, किशोर कुचके, अंबादास उमाळे, गणेश लोड, प्रवीण हगवणे, डॉ. अमित कावरे, डॉ. शंकरराव वाकोडे, गणेश तायडे, वैभव तराडे, प्रभाकर मानकर, गजानन थोरात, दिलीप पटोकार, संजय गावंडे, वसंतराव गावंडे, जितेंद्र देशमुख, विवेक भरणे, माधव काकड, अशोक राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.