Krantikari sanghatna supports to Farmers : शेतकरी पती-पत्नीला नवसंजीवनी; सहकाराची हृदयस्पर्शी कहाणी
Buldhana बैलजोडीच्या अभावामुळे स्वतःच्या खांद्यावर औत ओढणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि राज्यकर्त्यांची घोषणांची गोड गाज विझून गेली. मात्र, ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना’ने केवळ शब्द नव्हे, तर कृतीतून मदतीचा हात दिला आणि त्या वृद्ध शेतकऱ्याच्या जीवनात नवसंजीवनी दिली.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळती गावातील अंबादास गोविंद पवार आणि त्यांच्या पत्नीने बैल नसतानाही शेती कसण्याचे असाधारण धैर्य दाखवले. हे दृश्य राज्यात पावसाळी अधिवेशनातही गाजले. अनेक मंत्री व सेलिब्रिटींनी ‘मदतीची घोषणा’ केली. मात्र मदत आली नाही.
Chief Minister Youth Training Scheme : सहा हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांना सप्टेंबरनंतर ‘नो एंट्री’!
‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी या घटनेकडे संवेदनशीलतेने पाहिले. चार दिवसांत कार्यकर्त्यांनी एक लाख रुपयांची वर्गणी गोळा करून एक जोडी बैल खरेदी केली. तेही थेट वाजतगाजत त्या शेतकऱ्याच्या शेतात नेले. कार्यकर्त्यांनी स्वतः बैलांना औताला जुंपून शेतकरी अंबादास पवार यांच्याच्या हाती कासरे दिली.
Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील १२९८ जणांनी घेतला अकोट तालुक्यातील कृषी विम्याचा लाभ
या मदतीमुळे वृद्ध दाम्पत्याचे डोळे पाणावले. मुक्ताबाई पवार यांनी फोनवरून तुपकरांशी संवाद साधत भावना व्यक्त केल्या – “माझ्या नवऱ्याच्या खांद्यावरील जू तुम्ही काढले, आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही.” कृषिमंत्री, सहकारमंत्री, सेलिब्रिटींच्या घोषणांनंतरही मदत न मिळाल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. परंतु शेतकरी पुत्र असलेल्या तुपकर व त्यांच्या संघटनेने याला वाचा फोडली.
Sudhir Mungantiwar : मराठीच्या मुद्यावर दूर दूरपर्यंत कुठलेही राजकारण नाही !
तुपकरांच्या आवाहनानंतर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा आघाडी अध्यक्ष लक्ष्मण मोरे, तसेच राजेंद्र मोरे, गौतम कांबळे, अरुण कुलकर्णी आदी कार्यकर्त्यांनी ‘कृतीतून मदत’ करून दाखवली. “शेतकरी वाचला पाहिजे, म्हणून मी आहे. कुणालाही अडचण आली तर आमचा दरवाजा उघडाच आहे. सरकारने केवळ घोषणा केल्या, मदत केली नाही. मात्र आम्ही शेतकऱ्यांची साथ सोडणार नाही,” असा विश्वास रविकांत तुपकर यांनी पवार दाम्पत्याला दिला.