Uddhav Thackeray’s ShivSena warned Protest Shopping against Nafed stalled due to lack of bags : बारदान्याअभावी खरेदी रखडली; उद्धव गटाचा आंदोलनाचा इशारा
Buldhana Nafed Shoping बाजारभावापेक्षा नाफेडकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल नाफेडला विकण्याकडे आहे. मात्र, जिल्ह्यात नाफेडच्या खरेदीत बारदाना नसल्याने खाेडा येत आहे. त्यावरून आता जिल्ह्यात राजकारण तापले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्याने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाफेडची खरेदी शेवटच्या शेतकऱ्याचे साेयाबीन खरेदी करेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
खरेदी बंद केल्यास आंदाेलन करण्याचा इशाराही उद्धव ठाकरे गटाने निवेदनात दिला आहे. नाफेड अंतर्गत सुरू करण्यात आलेले शासकीय खरेदी केंद्र बारदान्याअभावी बंद पडत आहे. ही गंभीर बाब समोर आली आहे. एकीकडे योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट आहे. त्यात बारदानाअभावी केंद्र बंद पाडण्याचा किंवा सोयाबीन खरेदी न करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे.
Nagpur Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्यांची धाकधुक वाढली!
शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन खरेदी होईपर्यंत केंद्र बंद पडू देऊ नका, अन्यथा शिवसेना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने भेटून एक निवेदनही दिले आहे. सोयाबीनची खरेदी संथ गतीने सुरू असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. शेतमालामध्ये मॉईश्चर, काडी कचरा, फुटतुट, डागी प्रमाण अशी कारणे देऊन सोयाबीन खरेदी करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
त्यामुळे समस्या असल्याचे जिल्हाधिकारी यांना यावेळी जालिंधर बुधवत यांनी सांगितले. वेळेआधी सोयाबीन केंद्रे बंद करू नयेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी उद्धवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, तालुकाप्रमुख लखन गाडेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
Nagpur Police : नागपुरातील निम्म्या मसाज सेंटरमध्ये ‘सेक्स रॅकेट’ !
शेतकऱ्याने केला हाेता आत्मदहनाचा प्रयत्न
चिखली तालुक्यातील साेमठाणा खरेदी केंद्रावर एका शेतकऱ्याने नाफेडकडून खरेदी हाेत नाही. त्यामुळे अंगावर पेटाेल ओतून आत्मदहन ककरण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यानंतर या प्रकरणावर आता राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. साेयाबीन खरेदीवरून आता राजकारण तापल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.