E-entitlement system will be a boon for farmers Trust in the administration : प्रशासनाला विश्वास; आता ऑनलाईन फेरफार नोंदी शक्य
Buldhana डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी व नागरिकांसाठी शेतजमिनीसंदर्भातील 11 प्रकारच्या फेरफार नोंदी ऑनलाईन करण्याची सुविधा ई-हक्क प्रणालीव्दारे उपलब्ध करुन दिली आहे. या प्रणालीद्वारे नागरिक व शेतकऱ्यांना शेतजमीनीचे फेरफार नोंदी करणे सुलभ होणार आहे. ई-हक्क प्रणाली आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
ई-हक्क प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळया सेवांसाठी शासकीय कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्र सादर करावे लागतात. नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा आणि त्यांना कालर्यादेत नोंदी उपलब्ध होण्यासाठी शासनाने ई-हक्क प्रणाली कार्यान्वित केली आहे.
Police Commissioner of Nagpur : ८० गुन्ह्यांतील ३ कोटींचा मुद्देमाल केला परत !
या प्रणाली व्दारे विविध प्रकारच्या 11 प्रकारचे फेरफार नोंदीसाठी ऑनलाईन सुवधिा उपलब्ध करुन दिली आहे. नागरिकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी लागते. संकेतस्थळावर गेल्यानंतर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. तेथे जाऊन नोंदणी केल्यानंतर युजर आयडी व पासवर्ड टाकून विहीत माहिती भरावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
हे फेरफार करता येणार
ई-हक्क प्रणालीवर ई-करार नोंदी, बोजा चढविणे/गहाणखत, बोजा कमी करणे, वारसांची नोंद, मृतांचे नाव कमी करणे, अ.पा.क. शेरा कमी करणे, ए.कु.मे. नोद कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलने, खातेदाराचे माहिती भरणे, हस्तलिखित व संगणीकृत सातबारामध्ये तफावत दुरुस्ती करणे व मयत कुळाची वारस नोंद अशा ११ प्रकारच्या फेरफार सुविधा शेतकऱ्यांना करता येईल.
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
या याेजनेमुळे शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या प्रणालीद्वारे नागरिक व शेतकऱ्यांना शेतजमीनीचे फेरफार नोंदी करणे सुलभ होणार आहे. शेतकऱ्यांबराेबरच सर्वसामान्यांना त्याचा लाभ हाेणार आहे, असं जिल्हाधिकारी म्हणाले आहेत.