My Gurantee on MLA Siddharth Kharat : शिंगणे यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे
Buldhana मेहकर तालुक्यातील लोणीगवळी येथे आमदार सिद्धार्थ खरात यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे होते. त्यांनी आपल्या भाषणातून आमदार ‘सिद्धार्थ खरात हा माणूस माझ्या गॅरंटीचा आहे’, असं विधान केलं. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
खरात यांनी माझ्याकडे जवळपास सात वर्ष काम केले. ते माझ्या मतदारसंघाचे आहेत. त्यांना ३० वर्षांचा प्रशासकीय अधिकारीपदाचा अनुभव आहे. त्यांनी उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांचा दुधाचा प्रकल्प सुरू आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे. मेहकर लोणार मतदारसंघातील लोकांनी योग्य उमेदवार दिलाय, अशी स्तुतीसुमने देखील शिंगणे यांनी उधळली.
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांनी अधिकाऱ्यांना फोडला घाम !
माझी गॅरंटी म्हणजे मोदीची गॅरंटी नाही
त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी मी आलो होतो. त्या जाहीर सभेत मी स्वतः सांगितले होते सिद्धार्थ खरात यांना निवडून द्या. त्यांच्या पुढील कामाची गॅरंटी मी घेतो. त्यावेळी मी गॅरंटी दिली होती. आणि आपली गॅरंटी काही मोदी गॅरंटी नाही, असा टोला सुद्धा शिंगमे यांनी लगावला. हे सरकार फेल आहे, त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
शिंगणे यांनीच रस्ता दिला
आमदार सिद्धार्थ खरात यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘माझ्या गावाचा रस्ता सुद्धा डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांनी बनविला आहे. मी त्यांच्याकडे काम केले आहे. तेच माझे राजकीय गुरू आहेत. मेहकर लोणार मतदारसंघाच्या विकासात कुठेही कसर सोडणार नाही असा शब्द मी त्यांना देतो, असे खरात म्हणाले. महाविकास आघाडीच्यावतीने माझा सत्कार केल्याबद्दल मनापासून आनंद आहे. हा सोहळा बघून माझे उर भरून आले आहे. लोणी गवळीच्या जनतेने मला जे भरभरून प्रेम दिलं त्याचा मी शतशः ऋणी आहे, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.