Breaking

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी ठणकावले, पण प्रशासनाला फरक पडतो का?

Drain cleaning has never been completed before the monsoon season : नदी-नाल्यांची सफाई कधीच वेळेत झाली नाही; आदेशांचा किती परिणाम?

Nagpur अनेक सरकारं आलीत, मंत्री आले, बैठका झाल्या, निर्देश झालेत, ठणकावून सांगितले गेले. पण पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाली असं कधीच झालं नाही. नागपूर महानगरपालिका किंवा शहरालगत वाढलेल्या वस्त्यांमध्ये अनेक वर्षांपासून हीच अवस्था आहे. एक मुसळधार पाऊस प्रशासनाचं पितळ उघडं पाडायला पुरेसा असतो. अशात पालकमंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशांचा महापालिका किंवा एनएमआरडीएवर किती परिणाम होणार, याबाबत साशंकता आहे.

मंत्र्यांची बैठक घेतली आणि प्रशासनाने नालेसफाई वेळेत पूर्ण केली, असे आजपर्यंत झाले नाही. विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पाऊस येऊनही गेला आहे. बेमोसमी पावसात सुद्धा प्रशासनाची दाणादाण झाली. त्यामुळे प्रत्यक्ष पावसात बावनकुळेंच्या आदेशांचे परिणाम दिसणार की, प्रशासनाच्या कार्यपद्धतीची पुनरावृत्ती होणार, हे वेळच सांगेल.

Nagpur Municipal Corporation Election : नव्या प्रभागरचनेमुळे वाढली इच्छुकांची धाकधुक!

पावसाळा तोंडावर असताना एनएमआरडीए क्षेत्रातील नदी नाल्यांची हवी तशी साफसफाई झालेली नाही. त्यामुळे मूसळधार पावसात पुरपरिस्थितीचा धोका आहे. अशा स्थितीत बावनकुळे यांनी स्वत: एनएमआरडीएला निर्देश दिले. मनपाने शहरातील नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या सफाईचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, असा दावा केला आहे. हा दावा कितपत खरा आहे, हे पाऊस सुरू झाल्यावर कळेलच.

परंतु, शहरालगतच्या एनएमआरडीए क्षेत्रात नदी-नाल्यांची साफसफाई हवी तशी झालेली नाही. ही कामे नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) येत्या ३० जूनपूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. शहरातील पावसाळापूर्व कामांचा आढावा पालकमंत्री बावनकुळे यांनी मनपा मुख्यालयात घेतला.

Dr. Babanrao Taywade : कायद्यातील दुरुस्तीशिवाय जातनिहाय जनगणना अशक्य

पावसाळापूर्व कामे करताना लोकप्रतिनिधींना माहिती द्यावी तसेच त्यांच्या सूचनांवर अंमलबजावणी करण्यासाठी सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांसोबत झोननिहाय बैठका घेण्याचे नियोजन येत्या १० दिवसांत करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे शहरातील मानेवाडा – बेसा रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.