Breaking

Ajit Pawar will ask Dhananjay Munde to resign : ..तर अजित पवार घेतील धनंजय मुंडेंचा राजीनामा !

Ajit Pawar will accept Dhananjay Munde’s resignation Dharmaraobaba Atram clearly explained the situation in Beed : धर्मरावबाबा आत्राम यांनी स्पष्टच सांगितली बीडची परिस्थिती

Ajit Pawar News : धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. चौकशीत जे समोर येईल, त्यानुसार कार्यवाही होईल. केवळ आरोप होत आहेत, म्हणून मुंडेंचा राजीनामा मागता येऊ शकत नाही. आरोप सिद्ध झाले तर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल. हत्येची घटना नक्कीच चुकीची आहे. त्यांचा एक टक्का जरी सहभाग आहे, असं वाटलं तर अजित दादा राजीनामा घेतील, असे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

धनंजय मुंडेना विरोध वाढत आहे. पण जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत निर्णय घेणे चुकीचे आहे. सद्यस्थितीत तरी मुंडेंनी राजीनामा देणे गरजेचे नाही, असे सांगताना आत्राम यांनी शरद पवारांचे कौतुक केले. ते म्हणाले, शरद पवार बोलले ते खरे आहे. पुरोगामी विचाराचे असले तरी शरद पवार यांनी जे खरं आहे, तेच सांगितलं आणि संघाच्या कार्याचं कौतुक केलं. निवडणूकीत संघामुळे भरीव मतदान झालं. म्हणून मोठ्या प्रमाणात महायुतीच्या जागा निवडून आल्या. शरद पवार सांगतात की निवडणुकीत प्रभाव पडला, हे खरं आहे. शरद पवार सध्या आमच्या महायुतीला स्पोर्ट करतील असे वाटत नाही. पण शरद पवार महायुतीत आले तर चांगलं होईल. अद्याप अशी काही बैठक झाली नाही.

Nagpur Police : गर्लफ्रेंडला आयफोन देण्यासाठी केल्या चोऱ्या !

शरद पवारांच्या काही खासदारांना ऑफर दिली असं वाटत नाही. मत परिवर्तन होऊन ते आमच्याकडे आले तर विकासकामे करण्यासाठी त्यांनाच फायदा होईल. केंद्राचा निधी मिळेल. सत्तेत आल्यास फायदा होईल. त्यांच्याकडे खासदार आहेत. पण विरोधात राहून फायदा नाही, असे आत्राम म्हणाले. प्रफुल पटेल यांना मंत्रीपद दिले जाईल, असे मागेच सांगण्यात आले होते, पण त्यावेळीं तसे झाले नाही, असे ते म्हणाले.

Mahayuti Government : एसटी महामंडळातील इतर घोटाळ्यांची चौकशी कधी ?

हल्लीच्या राजकारणात काहीही शक्य आहे. याचा अनुभव गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने घेतला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं, अशी इच्छा राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी बोलून दाखवली होती. अन् आता आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तसेच वक्तव्य केले आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का, याची चर्चा सुरू झाली आहे. असे झाले तरी नवल वाटायला नको. कारण राजकारणात काहीही शक्य आहे.