Breaking

High Court Nagpur Bench : ठाकरे, दटकेंकडून आचारसंहितेची पायमल्ली, हायकोर्टात याचिका

Summons to Vikas Thakare, Pravin Datake : दोन्ही नेत्यांना समन्स; निवड रद्द करण्याची केली मागणी

Nagpur काँग्रेस आमदार विकास ठाकरे आणि भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची पायमल्ली केल्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी आणि दोन्ही मतदारसंघामध्ये नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने दोन्ही विजयी उमेदवारांना समन्स बजावला आहे.

आमदार विकास ठाकरे व प्रवीण दटके यांना समन्स बजावून आठ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्या. अभय मंत्री यांनी दिले आहेत. काँग्रेसचे विकास ठाकरे पश्चिम नागपुरातून विजयी झाले आहेत. तर भाजपचे प्रवीण दटके मध्य नागपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ठाकरे यांच्याविरुद्ध मतदार प्रीतम खंडाते तर, दटके यांच्याविरुद्ध विकास इंडिया पार्टीचे उमेदवार मो. इम्रान मो. हारून कुरैशी यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.

Ravikant Tupkar : लोणार व शेगाव तालुक्यात ढगफुटीचा कहर; पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी

२० नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री कोतवाली पोलिस ठाण्यातून मध्य नागपूर मतदारसंघातील ईव्हीएम भरलेले वाहन बेपत्ता करण्यात आले. तसेच, या घटनेपूर्वी भाजपा व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ईव्हीएम यंत्रावरून हाणामारी झाली. त्यांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाची तोडफोड केली. परिणामी, आचारसंहितेचा भंग झाला. भारतीय निवडणूक आयोग व कोतवाली पोलिसांनी यासंदर्भातील तक्रारीची दखल घेतली नाही. सीसीटीव्ही फुटेज जप्त केले नाही, असा आरोप कुरैशी यांनी केला आहे.

West Vidarbha : पश्चिम विदर्भातील प्रादेशिक असमतोलावर संशोधन

भारतीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली होती. असे असताना ठाकरे यांनी २८ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास हजारी पहाड येथे सभा घेतली. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले. यासंदर्भात खंडाते यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या, पण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली नाही, असा दावा संबंधित याचिकेत करण्यात आला आहे.