Breaking

Nitin Gadkari : गडकरींच्या कार्यक्षमतेवर सगळ्याच खासदारांना प्रचंड विश्वास

I don’t see another person of such height, praised by Sharad Pawar : इतक्या उंचीचा दुसरा माणूस दिसत नाही, शरद पवारांकडून कौतुक

New Delhi : संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रतिष्ठित चिंतामणराव देशमुख पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात शरद पवारांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

पवार म्हणाले, कोणत्याही खासदाराला नितीन गडकरी यांच्याबाबत विचारले तरी त्यांच्याविषयी सकारात्मक मतच ऐकायला मिळते. त्यांच्या कार्यक्षमतेवर खासदारांना प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे गडकरींच्या उंचीची व्यक्ती आम्हाला आजतरी दिसत नाही. गडकरींचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, तर देशपातळीवर त्यांचा प्रभाव आहे, असेही पवार यांनी ठामपणे सांगितले.

CGST Office : दारूसाठी GST कार्यालयातील फाईल्स विकल्या !

राजधानीत ज्या व्यक्तींनी कर्तृत्व गाजवले, त्यांच्यावर पुस्तके लिहिली जात आहेत. सी.डी. देशमुख यांच्यासारख्या द्रष्ट्या व्यक्तींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार नितीन गडकरी यांना मिळाल्याचा मला आनंद आहे,या पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या काळातील अनेक दिग्गज नेत्यांचा, त्यांच्या कामगिरीचा आणि राजकीय वाटचालीचा उल्लेख करत आठवणींना उजाळा दिला.

Ashish Jaiswal : आधीच तडजोड केली असती, तर ही वेळ आली नसती !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी.डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ, मधू दंडवते यांचं कार्य अधोरेखित करत पवारांनी देशाच्या प्रगतीतील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. पुरस्कार स्वीकारताना नितीन गडकरी यांनी नम्रपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सी.डी. देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारण्याची माझी पात्रता आहे की नाही, हे मला माहिती नाही. मात्र हा मोठा गौरव आहे, असे ते म्हणाले.