Breaking

Shivendraraje Bhosale : चिखलीमध्ये चौपदरीकरणासह ५ कामांना हिरवी झेंडी

Green flag for 5 projects including four-laning in Chikhli : मतदारसंघातील विविध प्रलंबित कामांना गती; बांधकाम मंत्र्यांनी घेतली बैठक

Chikhali चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार श्वेताताई महाले यांनी मुंबईत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील रस्ते विकास व अन्य पायाभूत सुविधांसंदर्भातील कामांचा आढावा घेऊन पाच प्रमुख रस्ते प्रकल्पांसाठी वावबदल करून कामांना मंजुरी मिळवून दिली आहे.

चिखली ते मलकापूर दरम्यानच्या महत्त्वाच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या कामासाठीही मंत्री भोसले यांच्याशी आमदार महाले यांची सकारात्मक चर्चा झाली. यासाठी आवश्यक निधी येत्या हिवाळी अधिवेशनात उपलब्ध करून देण्यात येईल, असे मंत्री महोदयांनी सांगितल्याचे आमदार महाले यांनी स्पष्ट केले.

Agriculture Ministry : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ७२ कृषी केंद्रांचे परवाने रद्द

चिखली विधानसभा मतदारसंघातील चौदा रस्त्यांची कामे विविध कारणांनी थांबलेली होती. जागेची अनुपलब्धता व इतर तांत्रिक अडचणींमुळे ही कामे रखडली होती. यासंदर्भात मंत्री भोसले यांच्यासमोर सविस्तर माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व कामांचा मार्ग मोकळा करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता काळे व उपकार्यकारी अभियंता दीपक चिंचोले उपस्थित होते.

रस्त्यांची गुणवत्ता राखण्यात ठेकेदारांकडून होत असलेल्या हलगर्जीपणाबाबतही आमदार महाले यांनी चिंता व्यक्त केली. यावर मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले की, निविदेतील अटींचे उल्लंघन करून रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यास किंवा कालावधीपूर्वीच ते खराब झाल्यास संबंधित ठेकेदारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यामुळे भविष्यातील अपघात व गैरसोयींना आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.

Rajkumar Patel : पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न; माजी आमदारपुत्राविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

यामध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे:

राष्ट्रीय महामार्ग ७५३ ए ते येळगाव – साखळी बु. – शिरपूर – सोनेवाडी – सावरगाव डुकरे
मालगणी – सावरगाव डुकरे – वाघापूर – अंत्रीकोळी – गोद्री – चांधई
एनएच ५४८ उ ते करणखेड – सावरखेड – ककळा – डासाळा
हातणी – वळती – सोमठाणा – पेठ – आन्वी – शेलगाव जहांगीर
गिरोला – सवणा – दिवठाणा – बोरगाव वसू – खंडाळा म. – भालगाव – रोहडा – मेरा

या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याबाबत आमदार महाले यांनी मागणी केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री भोसले यांनी तातडीने ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.