The issue of Mahadevi elephant will be discussed in the cabinet : हत्तीणीला परत आणण्याबाबत होणार विचार, मुख्यमंत्र्यांची माहिती
Amravati कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचा मुद्दा आता राज्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चेला येणार आहे. हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात मंगळवारी, कॅबिनेटमध्ये विचार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वानतारा अभयारण्यात पाठवण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिलेला आहे. पण तरी हत्तीणीला पुन्हा परत आणण्याच्या दृष्टीने कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत का, याचा विचार मंगळवारी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Pardhi Community : अखेर पारधी समाजाच्या घरकुलाचा प्रश्न सुटला
मुख्यमंत्री म्हणाले, “महादेवी हत्तीणीला त्रास होत असल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने हत्तीणीला अधिक योग्य वातावरण मिळावे यासाठी तिला अभयारण्यात हलवण्याची शिफारस केली. राज्यात हत्तींसाठी स्वतंत्र अभयारण्य नसल्याने हत्तीणीला वानतारा अभयारण्यात पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतरही कायम ठेवण्यात आला आहे.”
MSRTC : एसटीच्या सवलतींचा प्रवाशांना मोठा लाभ; पण महामंडळाचे कंबरडे मोडले
“नांदणी मठातील हत्तीणी अन्यत्र पाठवल्यामुळे अनेक भाविक नाराज झाले आहेत. त्यांच्याशी संबंधित आमदार आणि खासदारांशी चर्चा केली आहे. भाविकांच्या भावना आम्हाला मान्य आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी, कायद्यानुसार आणखी काही उपाय शक्य आहेत का, याचा सरकार स्तरावर गांभीर्याने विचार सुरू आहे. त्यासाठीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे,’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.