Breaking

Divya Deshmukh : सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिला देशमुख कुटुंबीयांसोबतच्या नात्याला उजाळा

Chief Justice Bhushan Gavai sheds light on his relationship with the Deshmukh family : नागपुरातील घरी जाऊन केले दिव्याचे अभिनंदन

Nagpur : नागपूरची कन्या दिव्या देशमुखने इतिहास रचला आहे. विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत तिने भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत केले. जॉर्जियामधील बातुमी येथे पार पडलेल्या स्पर्धेत तीने ही कामगिरी करून दाखवली. यासाठी देशभरातून दिव्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिच्यासाठी राज्याची तिजोरी उघडली आणि तीन कोटी रुपयांये बक्षीस तिला दिले. सरन्यायाधीश भुषण गवई यांनी घरी जाऊन दिव्याचा गौरव केला आहे.

सरन्यायाधीषांनी माध्यमांशी बोलताना देशमुख कुटुंबीयांसोबत असलेल्या नात्याला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, दिवंगत डॉ. के. जी. देशमुख हे अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापिठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. विद्वत्ता, अभ्यासू वृत्ती आणि व्यापक दृष्टीकोन यांसाठी त्यांची संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात ख्याती होती. डॉ. देशमुख आणि दादासाहेब गवई यांच्यात दीर्घ काळापाून दृढ आणि आत्मियतेचे संबंध होते.

Devendra Fadanvis : पुण्यातील दादागिरी मोडून काढणार !

देशमुख कुटुंब मुळचे अमरावतीचे आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाचा त्यांच्या कुटुंबाशी जिव्हाळा आहे. दिव्याने मिळवलेले यश केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद ही बाब आहे. तिच्या कामगिरीतून अनेकांना नवी प्रेरणा मिळणार आहे. या कामगिरीमुळे आणखी नव्या उंची गाठण्याची उमेद निर्माण होईल, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे.