Breaking

Dispute in Mahayuti : भाजप आमदार शिंदेंच्या आमदारांवर तुटून पडले !

Former Minister direct allegations; Shiv Sena also responds strongly : माजी मंत्र्यांचे थेट आरोप; शिवसेनेचेही कडाडून प्रत्युत्तर

Dhadgaon : धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा सार्वजनिक झाले आहेत. या मेळाव्यात भाजप आमदार आणि माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी थेट शिंदे गटाचे दोन आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमश्या पाडवी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी या दोघांवर एकेरी भाषेत टीका करत ते “टार्गेट” असल्याचे जाहीरपणे म्हटले. या वक्तव्यामुळे महायुतीतील तणाव तीव्र झाल्याचं स्पष्ट होत आहे.

विजयकुमार गावित यांनी भाषणात दोन्ही आमदारांवर टीका करताना “चंद्या आणि आमश्या मस्तीत आले आहेत” असे वक्तव्य केले. लढायचं असेल तर समोरासमोर लढा. मागून तक्रारी करून उपयोग नाही. मी दुर्लक्ष करत होतो. पण रविवारी मुंबईत असताना मी माझ्या पीएला माहिती काढायला सांगितली, लक्षवेधी लावणार आहे, असे ते म्हणाले.

Anil Deshmukh : राज्यभरात ‘मंडल’ पोहोचवणार ‘कमंडल’;ची माहिती; शरद पवार करणार उद्घाटन !

यासोबतच गावित यांनी आमदार आमश्या पाडवी यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावरही गंभीर आरोप केले. “पाडवी यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावावर घर असूनही त्यांनी घरकुलाचा लाभ घेतला,” असा आरोप त्यांनी सभेत केला. यामुळे सभा राजकीय रंगात रंगली आणि एकप्रकारे महायुतीत फाटाफूट होण्याचे संकेत दिसू लागले. गावित यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “परमेश्वरानेच गावित यांची मस्ती उतरवली. ते मंत्री असताना त्यांच्या मस्तीचा त्रास सगळ्यांनी सोसला. पक्षाला नुकसान होत असल्याने त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आलं. गावितांनी भान ठेवावं,” अशी खरमरीत प्रतिक्रिया रघुवंशी यांनी दिली.

OBC fight : ओबीसी समाजासाठी लढा थांबणार नाही !

रघुवंशी यांनी गावित कुटुंबावरही हल्ला चढवला. “गावित कुटुंबाला नंदुरबार जिल्ह्याचा सातबारा हवा आहे. त्यांनी चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी करत आपले उमेदवार उभे केले होते. काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून युतीला दगा दिला होता. त्याचा बदला जनतेने त्यांची मुलगी लोकसभेत पराभूत करून घेतला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.  भाजप आणि शिंदे गट यांच्यातील या जाहीर संघर्षामुळे स्थानिक पातळीवर महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक स्स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवरचे हे आरोप – प्रत्यारोप महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

_____