Dalit youth beaten up on suspicion of cow theft : वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
Buldhana खामगाव शहरातील गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
२३ जुलै रोजी रोहन पैठणकर या दलित तरुणाला तिघांनी मारहाण केली होती. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असून, दोन आरोपी अटकेत आहेत. मात्र, मुख्य आरोपी रोहित पगारिया हा घटनेपासून फरार आहे.
आरोपीचा शोध घेऊन अटक न झाल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या निदर्शनात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरही घोषणाबाजी करण्यात आली.
Vande Bharat train : शेगावला वंदे भारतचा थांबा, भाविकांना मोठा दिलासा
खामगाव शहरात घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात राजकारण तापले आहे. सामाजिक संघटनासोबतच राजकीय पक्षही आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आली तरी मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे या आरोपीला अटक होत होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रशासनास निवेदनही देण्यात आले.