Women protestested against the government by tying black rakhis : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने केला निषेध
Malkapur शासनाकडे ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा १५०० रुपये देण्यासाठी पैसा आहे, मात्र आमच्या शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे. अस्मानी-सुल्तानी संकटाने शेतकरी बांधव भरडला जात असून, दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या करीत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ६ लाख शेतकरी आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे.
ही आत्महत्येची शोकांतिका थांबविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना प्रतिकात्मक स्वरूपात काळ्या राख्या बांधून निषेध नोंदवला. त्यांनी शेतकरी भाऊरायांना या संकटातून मुक्त करण्याची साद घातली.
Home Ministery : १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; एका अधिकाऱ्याला वर्षभराची स्थगिती!
रक्षाबंधन निमित्त दरवर्षी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात येते. त्याच कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बहिणींना रक्षा बंधनाची भेट म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले. शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळोवेळी दुर्लक्ष करीत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याचे दिलेले आश्वासनही पाळले नाही. यामुळे देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रतिकात्मक ‘भाऊराया’ मानून टिळा लावून औक्षण करून काळ्या राख्या बांधण्यात आल्या.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह उपजिल्हाप्रमुख अजय टप, तालुकाप्रमुख अजित फुले, शहर प्रमुख शालिग्राम पाटील, शहर उपप्रमुख बळीराम बावस्कर, राहुल तायडे, अशोक गाढवे, संजय इंगळे, अजाबराव वाघ आणि असंख्य महिला उपस्थित होत्या.
Uddhav Balasaheb Thackarey : माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवा, शिवसेनेची मागणी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यासाठी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदाेलने करण्यात येत आहेत. त्याच आंदाेलनाचा भाग म्हणून राज्यभरात प्रहारच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना प्रतिकात्मक काळ्या राख्या बांधल्या आहेत. आता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.