A large number of girls in Nagpur go missing every year : नागपुरातील वास्तवाकडे कुणाचं लक्ष?
Nagpur दरवर्षी नागपुरातील मुलींचे बेपत्ता होणे चर्चेचा विषय असते. पण मुलींचे बेपत्ता होणे म्हणजे अपहरण समजले जाते. पण खरं तर नागपुरात मुली व महिलांचे बेपत्ता होण्यामागे वेगळीच कारणं पुढे आली आहेत. ही कारणं सर्वसामान्य कुटुंबांना धक्का बसतील अशी आहेत. पण नागपुरातील या वास्तवाकडे कुणाचं लक्ष आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपूरमध्ये अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही खूप आहे, ही धक्कादायक बाब आहे.
प्रेमसंबंध, अनैतिक संबंध, नटी होण्याची स्वप्न, प्रियकराच्या आमिषाच्या विश्वास, आई अभ्यासासाठी रागावली, मोबाईल हिसकावला, राग अनावर झाला या आणि अशा अतिशय क्षुल्लक कारणांवरून अल्पवयीन आणि शाळकरी मुली, तरुणी आणि महिलांनी घर सोडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गृहमंत्र्यांच्या शहरात गेल्या वर्षभरात तब्बल ५५९ मुली, महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातून अल्पवयीन मुली-तरुणी आणि विवाहित महिलासुद्धा घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. पोलिसांच्या नोंदीतून हे समोर आले आहे. दररोज तीन ते चार मुली-महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात घेतल्या जात आहे. त्यासाठी विविध कारणे जरी असली तरी अशा घटनांमुळे नवी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. अल्पवयीन मुलगी घर सोडून निघून गेली की पालकांची गर्दी पोलीस ठाण्यात होते.
Amravati Municipal Corporation मालमत्ता करापोटी भरलेले ३१ लाख फस्त!
अल्पवयी मुलगी असल्यास पोलीस अपहरणाची नोंद घेऊन तपास सुरु करतात. अल्पवयीन बेपत्ता झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करुन शोधण्यासाठी पथक नियुक्त करतात. मात्र, जेव्हा वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली तरुणी बेपत्ता झाल्यास पोलीस ‘मिसींग’ची नोंद करुन तपास थंडबस्त्यात ठेवतात.. त्यामुळे राज्यातील बेपत्ता झालेल्या तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंत शहरातून ५५९ गुन्ह्यांची (बेपत्ता) नोंद करण्यात आली. बेपत्ता झालेल्या ५५९ पैकी ५१५ जणांचा पोलिसांनी शोध घेतला