Breaking

Sudhir Mungantiwar : ‘क्लायमेट चेंज’ धोरणात राहणार चंद्रपूरचा सहभाग !

International conference to begin on Thursday Forest Academy Chandrapur : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गुरुवारपासून सुरू होणार इंटरनॅशनल कॉन्फरन्स

चंद्रपूर हा एकेकाळी दुर्लक्षीत असलेला जिल्हा. पण विकासाची दूरदृष्टी असलेले नेते लाभले की मागास जिल्ह्याचा कायापालट कसा होतो, ते राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने चंद्रपूर जिल्ह्यालाच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला बघायला मिळाले. महाराष्ट्र सरकारच्या वर्षानूवर्षे दुर्लक्षीत असलेल्या खात्यांमध्ये जान फुंकण्याचे काम मुनगंटीवार यांनी केले. आता ग्लोबल वॉर्मींग संपवण्यासाठी कर्तुत्ववान हात सरसावले आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मींगवर तोडगा निघेल, अशी आशा बळावली आहे.

१६, १७ व १८ जानेवारी २०२५ ला चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५’च्या निमित्ताने चंद्रपूरमधून ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद केला जाईल. सी फॉर चंद्रपूर हे सी फॉर क्लायमेट चेंजच्या संदर्भात धोरण तयार करण्यात मोठे योगदान देईल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज (सोमवार, दि. १३ जानेवारी) व्यक्त केला. या परिषदेत पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Sonam Wangchuk : लडाखमध्ये चीनचा कुठलाही प्रभाव नाही

सोमवारी १३ जानेवारीला आमदार मुनगंटीवार यांनी परिषदेच्या तयारीचा आढावा घेतला. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये १७० हून अधिक संशोधन पेपर्सचे सादरीकरण, जागतिक हवामान तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण व युवा नेतृत्वाला प्रोत्साहन, आदी उपक्रम होणार आहेत. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासाठी निश्चित महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा बैठकीला एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव (आभासी पद्धतीने), प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले व अधिकारी उपस्थित होते.

१६ जानेवारीला दुपारी ३ वाजता महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातावरण बदलावर चिंतन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात तात्कालिक नव्हे तर स्थायी स्वरुपाचे कार्य आवश्यक आहे. केवळ चंद्रपूरच्या नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील वातावरणात होणारे बदल, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण संवर्धन या संदर्भात राज्यामध्ये स्थायी समिती तयार करण्याचा निर्णय झाला आहे.

या परिषदेचे नियोजन मी वनमंत्री असतानाच झाले होते. त्याचे उद्घाटन येत्या १६ जानेवारीला होत आहे. यामध्ये महामहीम राज्यपालांसह जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासारखे पर्यावरण तज्ञही सहभागी होणार आहेत. अमेरिकेसह बाहेरील देशातूनही पर्यावरण तज्ञांचा यामध्ये समावेश असणार आहे, अशी माहितीही आमदार मुनगंटीवार यांनी दिली.

Sonam Wangchuk : लडाखमध्ये चीनचा कुठलाही प्रभाव नाही

आमच्यासह देशातील सर्व पर्यावरण प्रेमी, एनएनडीटी विद्यापीठ एकत्र येऊन सरकारला पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात एक कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करू. यात केवळ वृक्षारोपण नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने व्यापक कार्य करण्याचा विचार मांडण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यामधील सर्व पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना जोडण्यासाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत गांभिर्य असलेल्या संस्था व व्यक्ती सहभागी होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

वन अकादमीत होणार आंतरराष्ट्रीय परिषद
चंद्रपूरमधील वन अकादमी येथे तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५’चे आयोजन दिनांक १६ ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांना सिटी युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका यांचे शैक्षणिक सहकार्य लाभले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मँग्रोव्ह फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, इकोलॉजिकल सोसायटी, पुणे आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्या एकत्रित सहकार्याने परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.