Silent march in Washim to protest the inciden t in Beed: आराेपीवर कठाेर कारवाई हाेईपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन
Washim बीड व परभणी हत्यांकांडातील आराेपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी वाशीममध्ये मुक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वधमीय, सर्वपक्षीय व सर्व समाजांच्यावतीने मूक मौर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज देशमुख व बंधु धनंजय देशमुख उपस्थित हाेते. संताेष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आराेपींना कठाेर शिक्षा हाेईपर्यंत सहकार्य करा, अशी भावनीक हाक धनंजय देशमुख यांनी उपस्थितांना दिली.
शिवसेना संपर्कप्रमुख दिलीपराव जाधव, आमदार अमित झनक, गोपाळराव आटोटे, समाधान माने, मुस्ताका भाई, संजय वैरागडे, सलमान आली लाला, दिलीपराव सरनाईक, चक्रार गोटे, वैभव सरनाईक, पुरण बदलानी, राजू धौगढे आदी मान्यवरांची माेर्चात उपस्थिती हाेती. यावेळी रिसोड तालुक्यातील वाकद वैधील सरपंच अमोल देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून ५५ हजार रुपयाचा धनादेश प्रदान केला.
Gondia Zilla Parishad जिल्हा परिषद अध्यक्षाचा फैसला १८ जानेवारीला !
दोन्ही प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी. पीडित कुटुंबांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. विविध मागण्यांचे निवेदन सर्वपक्षीय सर्वधर्मीय, सर्वजातीय समाजाच्यावतीने देण्यात आले.
गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी या मागणीसाठी हा मूक मोर्चा वाशीम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आबेडकर चौक, बस स्टॅन्ड चौक, डॉ. देशमुख हॉस्पिटल, अंकोला नाका मार्गे निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांद्वारे जिल्हाधिकान्यांना निवेदन देण्यात आले
Nathuram Godse Hindu Mahasabha : नथुराम गोडसेंचे नाव असंसदीय नाही!
खुनाचा गुन्हा दाखल करावा
बीड हत्याकांडातील आरोपीवर मकोका लावण्यात आला. मात्र घटनेतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल का केला नाही. कराडसह सर्व आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही न्याय मागत राहणार, असं धनंजय देशमुख म्हणाले