Preparing for meetings independently : 17 जानेवारीपासून बैठकांचा धडाका
Akola शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोहळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या एकला चलो ची तयारी आता गाव पातळीपासून करण्यात येणार आहे त्यासाठी बैठकांचा धडाका लावण्यात आला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वरवर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका या शिवसेना कोणत्याही मित्र पक्षाला सोबत न घेता लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्या दृष्टीने तयारी करण्याकरता शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख व जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात नियोजन बैठकांचे आयोजन सुरू करण्यात आले आहे. गावपतळीपासून
या नियोजनाची तयारी केली जात आहे.
Local body elections: मुदतवाढीची शक्यता मावळली, विद्यमान सदस्य निरोप घेण्याच्या तयारीत
14 जानेवारी रोजी अकोला येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीपासून या नियोजनाची सुरुवात करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भ उपनेते आमदार नितीन देशमुख यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख तथा जि.प सदस्य गोपाल दातकर यांचे प्रमुख उपस्थित हे नियोजन बैठक संपन्न झाली. सभेत स्वबळावर
महानगरपालिका, नगरपालिका ,
नगरपंचायत व जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणूक लढविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
Kite flying nylon manja : प्रशासनाची एक चूक आणि तरुणाचा गेला जीव
आता पुढील बैठकांचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी तालुका व शहरनिहाय पदाधिकारी यांच्या बैठका आगामी काळात घेण्यात येणार आहे. सभेस प्रामुख्याने उपजिलाप्रमुख विकास पागृत मुकेश मुरुमकार, मंगेश काळे संजय शेळके, दिलीप बोचे, योगेश्वर वानखडे, शहरप्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर, सर्व तालुकाप्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी हजर होते.
…..
अशा होतील बैठका
१७ जानेवारी रोजी सकाळी. ११ वा
मूर्तिजापूर शहर व ग्रामीण
२१ जानेवारी दुपारी २ वा अकोट शहर व ग्रामीण
सायं. ५ वा तेल्हारा शहर व ग्रामीण
दि. २२ जानेवारी दुपारी १२ वा अकोला ग्रामीण व महानगर
सायं. ५ वा बार्शीटाकळी शहर व ग्रामीण याप्रमाणे तालुका निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
…..
बैठकांमधून ठरवणार पुढील रणनीती
बैठकीमध्ये शिवसेना, महिला आघाडी, युवासेना शेतकरीसेनेचे पदाधिकारी, तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहतील. त्याच बरोबर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाची हे
पदाधिकारी मेळावे संपन्न होवून पुढील रणनिती ठरविण्यात येईल.