Ajit Pawar will register his members for the first time in the camp in Shirdi शिबिरात अजित पवार पहिल्यांदा आपली सदस्य नोंदणी करतील
Shirdi : भारतीय जनता पक्षापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही त्यांच्या नवसंकल्प शिबिरासाठी शिर्डीची निवड केलेली आहे. १८ आणि १९ जानेवारी, असे दोन दिवस हे शिबीर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते शिबीराला उपस्थित राहणार आहेत. हे शिबिर यशस्वी करण्याची जबाबदारी अजित दादांनी त्यांचे विश्वासू सहकारी अर्थातच संग्राम कोते पाटील यांच्यावर दिलेली आहे.
संग्राम कोते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असतानाही अजित दादांनी महाराष्ट्रातील युवकांचे नेतृत्व कोते पाटलांवर सोपवले होते. त्यांनीही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत युवकांचे मजबूत संघटन उभे करून दादांचा विश्वास सार्थ ठरवला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही घोषीत होऊ शकतात. त्या दृष्टीने हे शिबिर महत्वाचे आहे आणि ही महत्वाची जबाबदारीसुद्धा अजित पवार यांनी संग्राम कोते पाटील यांच्यावर दिली आहे.
Nagpur municipal corporation: नागपूर मनपातील जुने रेकॉर्ड रद्द होणार
सदस्य नोंदणीचा शुभारंभ
‘अजितपर्व..! दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची..! राज्यस्तरीय नवसंकल्प शिबीर 2025’ १८ जानेवारीला सुरू होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षसंघठना बांधणी यावर राज्यस्तरीय दोन दिवसांचे शिबीरात मंधन आणि नियोजन होणार आहे. याच वेळी सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ होणार आहे. राज्यभरात सदस्य नोंदणीचा कार्यक्रम त्यानंतर लगेच सुरू होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगाव येथील आमदार आशुतोष काळे आणि संग्राम कोते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष कपील पवार, तालुकाध्यक्ष संदीप सोनावने, बाबासाहेब कोते. रमेश गोंदकर, दीपक गोंदकर आदी उपस्थित होते. नियोजनाच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर संग्राम कोते म्हणाले, पक्षाचे आजी-माजी आमदार, विद्यमान ९ मंत्री, तालुका व जिल्हाध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुख, असे मिळून पाचशे पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार आहेत.
Hair loss disease : चर्चा, बैठकांमध्ये केस गळतीचा लागेना सोक्षमोक्ष !
पहिल्यांदा अजित पवार स्वतः करतील नोंदणी..
उपमुख्यमंत्री अजित पवार दोन्ही दिवस शिबिरात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते फार्मात आहेत. त्यांचा हाच उत्साह पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यश मिळवून देईल. या शिबिरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे या शिबिराला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
विकासाची दृष्टी आणि प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून अजित पवार ओळखले जातात. विधानसभेतील पक्षाच्या यशानंतर पहिल्यांदाच हे शिबिर होत आहे. शिबिरात अजित पवार पहिल्यांदा स्वतःची सदस्य नोंदणी करतील. त्यानंतर राज्यभरातील सभासद नोंदणीस प्रारंभ होईल. हे शिबिर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीची दिशा निश्चित करणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी सांगितले.