Ashish Jaiswal becomes the joint guardian minister of Gadchiroli गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदी मुख्यमंत्री; जयस्वाल सहपालक
Gadchiroli अनेक वर्षे मंत्रिपदाची आस लावून बसलेले राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांना बंपर लॉटरी लागली आहे. पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यांचे राज्यमंत्री झाले. आणि आता त्यांना गडचिरोलीचेही सहपालक करण्यात आले आहे. मुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री राहतील. तर जयस्वाल त्यांचे सहकारी असतील. त्यामुळे जयस्वाल यांना मंत्रिपद उशिरा मिळाले, पण ‘छप्पर फाड के’ मिळाले, असच म्हणावं लागेल.
‘बीडला पाठविले तरी जाईल, पण मला गडचिरोलीचे पालकमंत्री व्हायला आवडेल’, असे फडणवीस काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी गडचिरोलीवरील दावा कायम ठेवला. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून ते जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्यासोबत शिंदेसेनेचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनवर्सन, विधि न्याय व कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांची सहपालकमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.
Akola Politics : विधानसभा निवडणुकीतील गटबाजीवर तक्रारींचे राजकारण
पालकमंत्र्यांची एकूणच यादी बघता फडणवीस यांची छाप पूर्णपणे दिसत आहे. बावनकुळेंकडे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद असणे. त्यांनी गडचिरोली स्वतःकडे ठेवणे. मुंबईमध्ये भाजपचे पालकमंत्री देणे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण त्यांनी गडचिरोलीची जबाबदारी घेणे महत्त्वाची बाब मानली जात आहे.
गडचिरोलीचे पालकमंत्री व्हायला एकेकाळी कोणी धजावत नव्हते. पण राज्याचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री होते. तेव्हापासून पायंडा पडला. त्यानंतर सत्तेत आलेले सरकारांमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घेत आहेत. फडणवीस यांनी गडचिरोली आपल्याकडे ठेवून विकासाला गती दिली आहे, हे महत्त्वाचे.
Export Policy of Mahayuti Government : अकोला जिल्ह्यातील डाळ व कापूस जाणार परदेशात !
जिल्ह्यात लोहखान उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोनसरीत स्टील निर्मिती प्रकल्पही उभारला आहे. आणखी काही नामांकित कंपन्या उद्योगांसाठी गुंतवणूक करण्यास सज्ज आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीवर थेट मुख्यमंत्र्यांचे लक्ष राहील. विमानतळ, रेल्वे, महामार्गाचे जाळे, उद्योगांची निर्मिती व स्थानिकांना रोजगार अशा सगळ्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहील.