Before meeting the boyfriend, the girlfriend was detained by the Nagpur police : प्रेयसीला आल्यापावली परत घेऊन गेले पोलीस
Nagpur १९९३ साली ‘हम है राही प्यार के’ नावाचा सिनेमा आला होता. सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यातील ‘मुंबई से गई दिल्ली, दिल्ली से गयी पटना, फिर भी ना मिला सजना’, हे गाणेसुद्धा लोकप्रिय झाले होते. या गाण्याचाच अनुभव पाटण्यातील एका अल्पवयीन प्रेयसीला आला. पाटण्यातील ही तरूणी नागपुरात येताच पोलिसांनी तिला पकडले आणि कुटुंबीयांना माहिती दिली.
त्याची आणि तिची एका लग्नात भेट झाली. तो नागपूरचा, ती पाटण्याची. मोबाईल नंबर्स शेअर झाले. फोनवर नियमित बोलायला लागले. बोलता बोलता मैत्री आणि नंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दोघांचेही वय सोळाच. सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसंच घडलं. पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती पाटण्यावरून नागपुरात आली. पण पोलीस तिला आल्यापावली स्टेशनवरूनच परत घेऊन गेले.
पाटण्यात राहणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थिनीचे नागपुरातील अकरावीच्या विद्यार्थ्यासह सूत जुळले. दोघांनीही घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. ती पाटण्यावरुन रेल्वेने नागपुरात पोहचली. तर तो रेल्वेस्थानकावर तिची वाट बघत उभा होता. मात्र, यादरम्यान, तरुणीच्या आईने मुलगी पळाल्याची तक्रार केली. पोलिसांनी रेल्वेस्थानकावर सापळा रचला.
प्रियकर आणि प्रेयसीची भेट होण्यापूर्वीच पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले. आईवडिलांच्या ताब्यात दिले. दोघेही अल्पवयीन असल्याने विषय गंभीरच होता. एका लग्नात ती मामाकडे गेली होती. त्या लग्नातच त्याची भेट झाली. तो नागपुरातील रहिवासी आहे. पहिल्याच भेटीत ते दोघेही एकमेकांकडे आकर्षीत झाले.
नियमित मोबाईलवर बोलत असल्याने त्यांची मैत्री हळूहळू फुलत गेली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यामुळे त्यांनी कुटुंबाचे बंधन तोडून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने तिला नागपुरात बोलावले. प्रेमविवाह करण्याचे पूर्ण प्लानिंग झाले. त्यामुळे तीदेखील लग्नाची पूर्ण तयारी करून नागपूरच्या दिशेने निघाली.
uddhav balasaheb thackeray shivsena : शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक बदल
पाटण्यातील रेल्वे स्थानकाहून तिने तिकीट घेतले. संघमित्रा एक्सप्रेसने नागपूरसाठी निघाली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. अखेर स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पाटण्याहून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. ती संघमित्रा एक्सप्रेसने निघाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यांनी एक पथक तयार केले.
त्यांच्या व्हॉट्स अॅपवर मुलीचं छायाचित्र होतं. गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येण्यापूर्वीच पथक फलाट क्रमांक तीनवर पोलिस हजर होते. गाडी येताच त्यांनी प्रत्येक डब्याची झडती घेतली. अखेर मुलगी एका कोचमध्ये त्यांना दिसली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मुलगी सुखरुप असल्याची माहिती तिच्या कुटुंबाला दिली. तिला आता शासकीय वसतिगृहात ठेवले आहे.