Breaking

Hiranwar murder case : हिरणवार हत्याकांडाचा सूत्रधार शेखूला अटक

 

The number of accused has reached nine : आरोपींची संख्या पोहोचली नऊवर

Nagpur News : पवन हिरणवार हत्याकांडाचा सूत्रधार शेखू इजाज खान आणि अजहर शेख यांना खापरखेडा पोलिसांनी मंगळवारी (२१ जानेवारी) मध्यरात्री अटक केली. बाबूळखेड्यातील जंगलात २ जानेवारीला घडलेल्या गोळीबार हत्याकांडात शेखू खान आणि त्याच्या साथीदारांनी पवन हिरणवारची हत्या केली होती.

शेखू खान व अजहर शेख हे हत्याकांडातील प्रमुख आरोपी होते. त्यानंतर हे दोघेही ३ आठवड्यांपासून फरार होते. गुप्त माहितीच्या आधारावर खापरखेडा पोलिसांनी लाहोरी बियरबार परिसरात सापळा रचला आणि त्यांना अटक केली. हिरणवार हत्याकांडातील एकूण आरोपींची संख्या आता ९ झाली आहे. यापूर्वी ७ आरोपींना अटक करण्यात आली होती.

Ladki Bahin : या ‘२९’ महिलांसाठी सत्ताधारी नाहीत ‘लाडके भाऊ’!

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सिद्धार्थ उर्फ गण्या, प्रथम उर्फ बाबू, अभिराज कैलास कनोजिया, ललित उर्फ अवी, नितेश उर्फ अंकित, सेवक उर्फ देवदास आणि रितीक शैलेश यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तपासामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी शेखू खान व अजहर शेख यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम करीत आहेत.

काय आहे प्रकरण ?
कुख्यात शेखू खानला भाऊ सरोज खानच्या हत्याकांडाचा हिरणवार बंधूंना संपवून बदला घ्यायचा होता. त्यासाठी शेखूने १० लाख रुपयांची सुपारी गणेश कोवे आणि प्रथम शाक्य यांच्या टोळीला दिली होती. हिरणवार टोळीतील सदस्य गणेश फितूर झाला. त्यामुळेच पवन हिरणवारचा खून करण्यात शेखू टोळीला यश मिळाले.

Accident : तीन वाहनांच्या अपघातात तीन ठार, आठ गंभीर जखमी

 

दोन वर्षांपूर्वी शंकरनगर चौकात भरदिवसा शेखूचा भाऊ सरोज खानचा पवन हिरणवार टोळीने खून केला होता. तेव्हापासून शेखूला भावाच्या हत्याकांडाचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी शेखू कितीही पैसे खर्च करायला तयार होता. दोनच महिन्यांपूर्वी हिरणवार टोळीचा म्होरक्या पवन कारागृहातून बाहेर आला होता. तेव्हापासूनच शेखू हा पवन आणि बंटीचा खून करण्याचा कट आखत होता. दोनदा प्रयत्न करुनही यश मिळत नव्हते.

शेवटी त्याने हिरणवार टोळीतील सदस्य गणेश कोवे यालाच कामाला लावण्याचे ठरवले. गणेश हा पवन आणि बंटी हिरणवारचा मित्र होता. पवनने बाबुलखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी जायचे असल्याचे ठरवले. त्यासाठी गुरुवारी दुपारी ते दर्शनाला गेले. पवन आणि बंटी हिरणवार यांच्यासोबत टोळीतील सदस्य हिमांशू गजभीये, साहिल ऊर्फ सोनू शेंद्रे हे सुद्धा होते. शेखूने आरोपी प्रथम शाक्य, अधीराज कनोजिया, ललीत ऊर्फ अवी भुसारी आणि सिद्धार्थ ऊर्फ गणेश कोवे यांना हाताशी धरले. त्यांना १० लाख रुपये देण्याचे ठरले. आरोपींनीही १० लाखांत हिरणवार बंधूची टीप देण्याची सुपारी घेतली होती