Divisional Commissioner’s instructions: Benefits of housing should also be provided : घरकुलाचाही लाभ मिळावा, विभागीय आयुक्तांच्या सूचना
Nagpur : तृतीयपंथीयांच्या संरक्षणासोबतच ओळखपत्र, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र तसेच घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हानिहाय विशेष शिबीराचे आयोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची बैठक बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अपर आयुक्त प्रदीप देशमुख, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख, विधी व न्याय विभागाच्या सुवर्णा खंडेलवाल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त अनिल बन्सोड, सारथी ट्रस्टच्या आचल वर्मा, विद्या कांबळे, तनुश्री आदी उपस्थित होते.
Mobile tower : देवळीत ‘टॉवर पे टॉवर’, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळातर्फे विभागातील तृतीयपंथीयांची नोंदणी राष्ट्रीय पोर्टलवर करण्यात येत आहे. विभागात २८९ तृतीयपंथीयांची नोंदणी झाली आहे. यांपैकी २३५ व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. विभागातील तृतीयपंथीयांचे सर्वेक्षणानुसार आधार कार्ड, राशन कार्ड व मतदान ओळखपत्र देण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना करताना बिदरी म्हणाल्या की, ज्या व्यक्तींना घराची आवश्यकता आहे, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत.
कौशल्य विकासावर हवा भर
तृतीयपंथीयांमध्ये असलेल्या विविध कौशल्यांसोबतच रोजगारक्षम कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करावे. तसेच त्यांना मागणीनुसार पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. यासाठी विभागीय समाज कल्याण अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करावा. तृतीयपंथीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी सादर केलेल्या सुचनांनुसार जिल्हा पोलिस अधिक्षकांनी विशेष बैठक आयोजित करावी.
See the world after death : मृत्यूनंतर ‘रूद्र’च्या डोळ्यांनी दोघांना मिळाली ‘दृष्टी’
कल्याण मंडळातर्फे विविध योजनांच्या लाभ देण्यात येत आहे. विभागातील २१९ तृतीयपंथीयांना आधार कार्ड, मतदान कार्ड व राशन कार्ड देण्यात आले आहेत. तसेच २१७ पोर्टलद्वारे ओळखपत्र तर २२१ लाभार्थ्यांचे विकास तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १६५, चंद्रपूर ३३, गोंदिया १२ तर वर्धा, भंडार व गडचिरोली प्रत्येकी ४ तृतीयपंथी लाभार्थ्यांचा समावेश आहे.