Effectively run a ‘Copy-free Exam’ campaign : पारदर्शकता निर्माण करण्याचे मंत्री डॉ. पंकज भोयर यांचे आवाहन
Wardha परीक्षेत कॉपी करणे ही एक प्रकारची लागलेली कीड आहे. तिचा बीमोड करणे सर्वांचे कर्तव्य आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवून परीक्षेत पारदर्शकता निर्माण करा, असे आवाहन शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात शनिवारी (२५ जानेवारी) नागपूर विभागातील परीक्षा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची ‘कॉपीमुक्त अभियान व गैरमार्गाविरूद्ध लढा’ या अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
Akola Police खबरदार ! शाळेच्या आवारात तंबाखू विकणाऱ्यांची आता खैर नाही
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, नागपूर विभागीय मंडळाच्या अध्यक्ष माधुरी सावरकर, सचिव चिंतामण वंजारी, शिक्षण सहसंचालक दीपेश लोखंडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीषा भडंग, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितू गावंडे उपस्थित होत्या.
परीक्षेदरम्यान एखाद्या चुकीमुळे पूर्ण विभाग दोषी ठरविला जातो. या चुका होऊ नये, यासाठी ही कार्यशाळा आहे. कॉपी करणाऱ्यांची वर्गवारी होणे गरजेचे आहे. पाल्याने इतरांची बरोबरी केली पाहिजे, असा पालकांचा उद्देश असतो. अशावेळी दडपणात आलेला विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करतो. काही मुले आत्महत्येसारखे मार्ग पत्करतात. यापासून त्यांना परावृत्त करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
Minister of State Indranil Naik : प्रत्येकाने वाचावे भारताचे संविधान
शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे निकडीचे आहे. एकीकडे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थी कमी होत आहेत. तर ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्याचे दिसून येते. प्रवेश वाढविण्यासाठी संचालक त्यांना उत्तीर्ण होण्याची हमी देतात. यातून कॉपीचा प्रकार होतो. याला पायबंद घालणे गरजेचे आहे, असे डॉ. भाेयर यांनी सांगितले.
परीक्षेदरम्यान गोंधळ होऊ नये, सुरक्षा व्यवस्था चोख राहावी, यासाठी पोलिस विभागाची बैठक घेण्यात येईल. परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पोलिस पाटलांना सोपविण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल. भरारी पथकांनी आपले काम चोखपणे बजावावे. आपली शाळा आदर्श बनविण्यासाठी पीएम श्री, सीएम श्री व क्रीडांगण योजनेचे प्रस्ताव सादर करावे. शिक्षण विभागाने यासाठी शाळांना प्रेरीत करावे, असे डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.